Jalyukt Shivar Agrowon
ॲग्रो विशेष

Jalyukt Shivar: जलयुक्त शिवार अभियानातील ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित

Water Conservation: जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अभियान अंतर्गंत कृषी विभागा मार्फत प्रस्तावित २१६ पैकी १२१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

Team Agrowon

Parbhani News: जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अभियान अंतर्गंत कृषी विभागा मार्फत प्रस्तावित २१६ पैकी  १२१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. परंतु अंदाजित १ कोटी १७ लाख ३९ हजार रुपये खर्चाच्या ९५ कामांची प्रशासकीय मान्यता प्रलंबित आहे. त्यात ढाळीचे बांध, सलग समतल चर, नाला खोलीकरण या कामांचा समावेश आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाच्या सूत्रांनी दिली.

जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ९१ गावांची निवड झालेली आहे. या अंतर्गंत कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, मृद व जलसंधारण विभाग, जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग या यंत्रणा मार्फत जलसंधारणाची विविध कामे प्रस्तावित आहेत. त्यात ढाळीचे बांध, सलग समतळ चर, नाला खोलीकरण, रिचार्ज शाफ्ट, सिमेंट नाला बांध,

बंधारे दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती आदी मिळून अंदाजित ४७ कोटी ३० लाख ६९ हजार रुपये खर्चाची ८९३ कामे प्रस्तावित आहेत. कृषी विभागामार्फत ५ कोटी ४ लाख २९ हजार रुपये खर्चाची २१६ कामे प्रस्तावित आहेत. त्यापैकी ३ कोटी ८६ लाख ९ हजार रुपये खर्चाच्या १२१ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

परंतु अद्याप १ कोटी १७ लाख ३९ हजार रुपये खर्चाची ९५ कामे प्रलंबित आहेत. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेअंतर्गंत प्रस्तावित ४२ लाख ९ हजार रुपये खर्चाच्या रिचार्ज शाफ्टच्या ६६ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मृद व जलसंधारण विभाग अंतर्गंत ३८ कोटी ४९ लाख ५ हजार रुपये खर्चाची सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, सिमेंट नाला बांध दुरुस्ती  मिळून ५८८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

लघु पाटबंधारे विभाग मार्फत ३ कोटी ३४ लाख रुपये खर्चाची सिमेंट नाला बंधारे दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्तीच्या २३ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली.प्रशासकीय मान्यता दिल्यापैकी अनेक कामे सुरु झाली आहेत. त्यापैकी पूर्ण झालेल्या कामांची माहिती तालुका स्तरावर असून ती संकलित करण्यात येईल. त्यानंतरच जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या एकूण कामांची संख्या समजू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

एकूण कामे आणि खर्च (परभणी जिल्हा)

एकूण प्रस्तावित कामे (सर्व विभाग मिळून) : ८९३ कामे

अंदाजित खर्च : ४७ कोटी ३० लाख ६९ हजार 

कृषी विभागाकडून प्रस्तावित कामे

कामांची संख्या: २१६ कामे

एकूण खर्च: ५ कोटी ४ लाख 

प्रशासकीय मान्यता मिळालेलीकामे: १२१ कामे

खर्च: ३ कोटी ८६ लाख ९ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seafood Export: अमेरिकेच्या आयातशुल्क वाढीचा कोळंबी निर्यातीवर परिणाम, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणेंची माहिती

FSSAI Registration: दूध उत्पादक-विक्रेत्यांना एफएसएसएआय नोंदणी सक्तीची

Unseasonal Rain: माकणी परिसरात पाऊस, गारपीट

Krishi Kumbh Exhibition: ‘कृषिकुंभ’कडे मंत्री, लोकप्रतिनिधींची पाठ

Unseasonal Rain Damage: ‘अवकाळी’ने रब्बी पिकांसह फळबागांना फटका

SCROLL FOR NEXT