Crop Irrigation Solution : शेतकऱ्यांकडून सिमेंट टाक्यांचा पर्याय

Agriculture Irrigation : संरक्षित पाणी साठ्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेततळ्यांची उभारणी केली आहे. मात्र यात साठवलेले पाणी वीजपुरवठाअभावी गरजेच्यावेळी पिकांना देण्यात अडचणी येतात.
Crop Irrigation Solution
Crop Irrigation SolutionAgrowon
Published on
Updated on

Nashik News : संरक्षित पाणी साठ्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी शेततळ्यांची उभारणी केली आहे. मात्र यात साठवलेले पाणी वीजपुरवठाअभावी गरजेच्यावेळी पिकांना देण्यात अडचणी येतात.

परिणामी विहिरी तसेच कूपनलिकेतील उपसा केलेले पाणी शेततळ्यातपेक्षा सिमेंटच्या टाक्यांमध्ये साठवणूक केल्यास गरजेच्यावेळी सिंचन करणे शेतकऱ्यांना सोपे जाते. त्यामुळे देवळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता शेततळ्यांना पर्याय देत सिमेंट टाक्यांची उभारणी केली आहे.

शेततळ्यांमध्ये पाणी संचय केल्यानंतर गरजेचे वेळी पिकांना पाणी देण्यासाठी उपलब्ध होतें;मात्र ग्रामीण भागात अनेक भारनियमन हा मुद्दा अडचणीचा ठरतो. तुलनेत सिमेंटच्या टाकीची बांधणी केल्यास विहीर व कूपनलिकेतील पाणी उपसा करून साठवल्यास वीजपुरवठा नसतानाही किंवा भारनियमन काळात पाणी प्रवाही पद्धतीने किंवा गरजेनुसार ठिबक सिंचनाद्वारे देता येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Crop Irrigation Solution
Agriculture Irrigation : शेतीसाठी ‘धनपूर’च्या पाण्याची प्रतीक्षा

ग्रामीण वीज पुरवठ्याचे वेळापत्रक शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरते.दिवसा कमी तर रात्रीच्या वेळी प्रामुख्याने कृषीपंप चालेल अशा पद्धतीने वीजपुरवठा केला जातो.यात अनेकदा बिघाड होण्याचे प्रकार घडतात.त्यामुळे रात्र जागूनही सिंचन पाळी पूर्ण होत नाही.

यासह रात्रीच्यावेळी जंगली जनावरे यांचे हल्ले तर सर्प,विंचू यांचा दंश होण्याचा धोका असतो. यासह जिल्ह्यात प्रामुख्याने कांदा,भाजीपाला यासह फळपिकांच्या लागवडी असतात.कांदा लागवडपश्चात अनेकदा पाणी भरताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. पिकांचे पोषण व वाढीच्या अवस्थेत परिणाम होतो. त्यामुळे हा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे.

Crop Irrigation Solution
Agriculture Irrigation : ‘जायकवाडी’च्या पाण्याअभावी पिके होरपळली

...असे आहेत फायदे

रात्रीच्या वेळेस वीज असताना विहिरींचे पाणी, तसेच कूपनलिकांचे पाणी या टाक्यांमध्ये साठवून ठेवता येते व साठवलेले पाणी दिवसा पिकांना देता येते.

लेट खरीप किंवा रब्बी कांदा लागवडीच्या वेळी याकुळे जनरेटर अथवा पर्यायी वीजपुरवठा उपलब्धतेची गरज नाही.

थेट प्रवाही पद्धतीने किंवा ठिबक सिंचनाद्वारे पिकांना सिंचन देणे शक्य.

या गावात उभारणी :

वाजगाव, खामखेडा, पिंपळदर, रामेश्वर, सावकी, भऊर

विठेवाडी, खर्डे, कनकापूर,मांजरवाडी, खालप, लोहणेर

रात्री वीजपुरवठा असल्याने पाणी या टाक्यांमध्ये पाणी साठवले जाते. ते दिवसा पिकांना देता येते. रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यता असते मात्र यामुळे ही संकट नाही. या टाक्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहेत.
–पवन आहेर, शेतकरी, खामखेडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com