Corona Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Corona Update : कोरोना जेएन.१ व्हेरिएंट,पंढरपुरात प्रशासन सज्ज

Pandharpur Vithhal Mandir : राज्यात सध्या जेएन.१ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक येतात.

Team Agrowon

Solapur News : राज्यात सध्या जेएन.१ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. पंढरपूरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक येतात. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून, पंढरपुरात २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत श्री शिव महापुराण कथा व श्री राम कथा सोहळा कार्यक्रमानिमित्त, तसेच नाताळ सणानिमित्त सुट्टी असल्याने श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे.

या पार्श्‍वभूमीवर प्रशासन सज्ज असून, भाविकांनी व नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेऊन आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

पंढरपुरात आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणची तसेच शहरातील विविध ठिकाणी प्रांताधिकारी गुरव यांनी पाहणी केली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जून भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, महावितरणचे श्री. भोळे, पोलिस निरीक्षक अरुण फुगे, आरोग्य निरीक्षक शदर वाघमारे उपस्थित होते.

श्री शिव महापुराण कथा व श्री राम कथा सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, जेएन.१ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्‍वभूमीवर आयोजकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. येणाऱ्या भाविकांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील या दृष्टीने नियोजन करावे. मास्क, सॅनिटायझरची उपलब्धता ठेवावी. स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी.

पाण्याची वेळोवळी तपासणी करण्यात यावी. स्वच्छतागृहाची मुबलक प्रमाणात उपलब्धता ठेवावी, अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्य पदार्थांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी त्याचबरोबर फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करून घ्यावे, सुरक्षित विद्युतपुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी गुरव यांनी केल्या.

नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही प्रांताधिकारी गुरव यांनी केले आहे.

मंदिर समितीकडूनही नियोजन

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविक येतात. राज्यात सध्या जेएन.१ हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. मंदिर समितीकडूनही भाविकांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन करण्यात येत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT