Solapur ZP : कर न भरल्यास लोकअदालतीत खटला

Gram Panchayat tax : मिळकतदारांनी ग्रामपंचायतीचा कर वेळेत भरावा, अन्यथा थकबाकीदारांवर खटला दाखल करून लोकअदालतीत पाठविण्याची किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार त्याच्या मालमत्तेवर बोजा चढविला जाऊ शकतो.
Solapur ZP
Solapur ZPAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यातील एक हजार १९ ग्रामपंचायतींना यंदा पाणीपट्टी व घरपट्टीतून ८० कोटी ९७ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. अद्याप ४३ कोटी २३ लाख रुपयांची वसुली झालेली नाही.

मिळकतदारांनी ग्रामपंचायतीचा कर वेळेत भरावा, अन्यथा थकबाकीदारांवर खटला दाखल करून लोकअदालतीत पाठविण्याची किंवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार त्याच्या मालमत्तेवर बोजा चढविला जाऊ शकतो.

Solapur ZP
ZP Fund : झेडपीचा अखर्चित निधी परत जाऊ देऊ नका

या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीचे २७ कोटी ९३ लाख रुपये आणि घरपट्टीचे ५३ कोटी चार लाख वसूल करणे अपेक्षित आहे. परंतु, कर वसुलीत करमाळा, माढा, मंगळवेढा हे तालुके पिछाडीवर आहेत.

संबंधित तालुक्यातील ग्रामसेवकांना त्यासंबंधीच्या सक्त सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मागच्या महिन्यापर्यंत पाणीपट्टीतून १३ कोटी १८ लाख रुपये तर घरपट्टीतून २४ कोटी ५६ लाखांची वसुली झाली आहे. अद्याप ६५ टक्के वसुली राहिलेली आहे.

Solapur ZP
Pune ZP : झेडपीच्या शिक्षण विभागात झडती सुरू

आता थकबाकीदारांना नोटीस (समन्स) बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. जे मिळकतदार ग्रामपंचायतीची थकबाकी भरणार नाही, त्याला लोकअदालतीत पाठवून वसुलीची कार्यवाही केली जाऊ शकते.

दुसरीकडे सातत्याने थकबाकीत असलेल्या मिळकतदाराच्या चल-अचल मालमत्तेवर बोजा चढविला जाईल. त्यामुळे या कारवाईपासून दूर राहायचे असल्यास मिळकतदारांनी त्यांच्याकडील ग्रामपंचायतीचा कर वेळेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

करासाठी दाखल्यासाठी अडवणूक नको

एखाद्या मिळकतदाराने पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरलेली नाही म्हणून त्याला शासकीय योजनांचा लाभ न देणे, उतारा किंवा इतर दाखला न देणे, असे कोणत्याही नियमात नाही. नागरिकांनी दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दाखला देणे बंधनकारक आहे. तरीपण, आपल्या गावाच्या विकासाला हातभार लागावा, यासाठी कर वेळेत भरावा, असे अपेक्षित आहे. थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते.

ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था असून, गावातील विकासकामांसाठी पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध असल्यास कोणतीही कामे प्रलंबित राहत नाहीत. गावकऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येकांनी पाणीपट्टी, घरपट्टी वेळेत भरणे जरुरी आहे.
- इशाद्दीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com