Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करावेत’

Team Agrowon

Hingoli News : जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेती पिकाचे, पशुधन, घरे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सोमवारी (ता. २) सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

गुगलमीटद्वारे ऑनलाइन बैठकीत बोलतहोते. यावेळी जि. प. चे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गोयल म्हणाले, की जिल्ह्यातील काही गावामध्ये नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले. त्यासर्वांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांच्या अन्न-पाणी आणि निवाऱ्याची सोय करावी. पाऊस आणि पुराच्यापाण्याने जिल्ह्यातील नुकसान झालेल्या भागातील शेती, घरे, जनावरांचे तातडीने पंचनामे सुरु करावेत.

अतिवृष्टीमध्ये जीवित ववित्तहानीची परिपूर्ण माहिती तयार करावी. मदतीची आवश्यकता असलेल्या ठिकाणी तातडीने मदत पाठविण्याची व्यवस्था करावी. महावितरण विभागाने खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याची प्राधान्याने आणि तत्काळ कार्यवाही करावी. वीज उपकेंद्र, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये पाणी शिरले आहे. त्याठिकाणचे पाणी काढून देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश गोयल यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Fish Production : पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT