Crop Damage : उत्तर खटावमधील घेवडा पीक धोक्‍यात

Vegetable Crop : ऑगस्ट महिन्यातील संततधार पावसाने उत्तर खटावमधील घेवडा पीक यंदा धोक्‍यात आले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Satara News : ऑगस्ट महिन्यातील संततधार पावसाने उत्तर खटावमधील घेवडा पीक यंदा धोक्‍यात आले आहे. सलग महिनाभर पावसाने दमदार हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेले पीक सडून गेले असून, शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

तालुक्‍याच्या उत्तर भागात खरीप हंगामात घेवडा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. सोबतीला वाटाणा, सोयाबीन आणि कडधान्ये केली जातात, तसेच आल्याचे बारमाही पीक देखील घेतले जाते. मात्र, यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांना बसत असून, शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून जाण्याची भीती आहे.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीने झालेल्या शेतीनुकसानीची भरपाई रखडली

यंदा मॉन्सून वेळेवर दाखल झाल्याने जूनच्या अखेरीस पेरण्या झाल्या. सुरुवातीला सर्वच पिके जोमात आली. मात्र, ऑगस्ट महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाने सतत हजेरी लावल्याने घेवडा व वाटाणा पीक अडचणीत आले. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके कुजून गेली आहेत, तसेच इतर पिकेही पिवळी पडत आहेत.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीचा ८४ हजार शेतकऱ्यांना तडाखा

दरम्यान, खरीप हंगामातील घेवडा, सोयाबीन या पिकांवरच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून असते. सततच्या मुसळधार पावसाने ही पिके उद्ध्वस्त होत असल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे घेवडा पिकाचे नुकसान झाले आहे. घेवड्याच्या शेंगा सडल्याने पीक हातात येईल, याची शाश्‍वती नाही. यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
- विशाल फडतरे, शेतकरी, फडतरवाडी (बुध)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com