Marathwada Crop Damage: राज्यात पावसाने पिकांची दाणादाण; पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश

Heavy Rain Crop Damage : राज्याच्या अनेक भागात मागील तीन दिवसांपासून पावसाने दाणादाण केली. नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, हळद, केळी, संत्रा, मोसंबी पिकाला फटका बसला.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या अनेक भागात मागील तीन दिवसांपासून पावसाने दाणादाण केली. नदी-नाल्यांना पूर आला. यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, हळद, केळी, संत्रा, मोसंबी पिकाला फटका बसला. मराठवाडा आणि विदर्भात नुकसान जास्त आहे. गेल्यावर्षीचा दुष्काळ सोसल्यानंतर यंदा चांगल्या पिकाच्या स्वप्नावर पावसाने पाणी फेरले. नुकसान लक्षात घेऊन सरकारनेही पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. तर विदर्भातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गोदावरी, पूर्णा, दुधना, कयाधू, करपरा, इंद्रायणी, थुना आदी नद्यांना पूर आले. त्यामुळे शेतांमध्येही पाणी शिरले. शेत शिवारं जलमय झाली. पुरामुळे जमिनी खरडून गेल्या. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसानही वाढले. अनेक ठिकाणी पीकं पाण्याखाली गेली. 

Crop Damage
Heavy Rain Crop Damage : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन लाख हेक्टरचे नुकसान

कापूस पीक बोंड लागण्याच्या स्थितीत आहे. पावसामुळे पातेगळ आणि फुलगळ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच दाणे पक्व होण्याच्या स्थितीत असलेल्या सोयाबीन पीक अनेक ठिकाणी पाण्याखाली गेले. हळद पिकातही पाणी साचले आहे. तूर  पिकालाही फटका बसला. तसेच केळी, संत्रा आणि मोसंबी पिकाचेही नुकसान वाढले. भाजीपाला पिकालाही फठका बसला. 

घरांची पडझड, शेतातील आखाडे, ठिबक संच, सौर कृषिपंप पॅनेलचे नुकसान झाले. पूरामध्ये कडब्याच्या गंजी वाहून गेल्या. काही गाव शिवारात घरांची पडझड झाली. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. तर नांदेड जिल्ह्यात २१ जनावरांचाही मृत्यू झाला होता.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीचा ८४ हजार शेतकऱ्यांना तडाखा

नुकसान करणाऱ्या पावसाला सुरुवात झाली शनिवारपासून. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात पावसाचे प्रमाण वाढले. त्यातही मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक होता. मागील ३ दिवसांमध्ये मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही हीच परिस्थिती होती. 

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सोमवारपर्यंत पावसाने दाणादाण केली होती. तब्बल २८४ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. जालना, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये तर पावसाने हाहाकार केला. या जिल्ह्यांमध्ये सरासरी १०७ ते १३८ मिलिमीटर दरम्यान पाऊस पडला. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांमध्ये सरासरी ५६ ते ९१ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले खळखळून वाहत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुखेड, लोहा, हदगाव, देगलूर, मुदखेड, अर्धापूर व नायगाव या तालुक्यांसह तब्बल ४५ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांसह हळद, केळी, भाजीपाला या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिनही जिल्ह्यांमध्ये मागील काही तासांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. वाशीम जिल्ह्यात पाच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. सततच्या पावसाने सोयाबीन, कपाशी पिकांचे नुकसान झाले. सखल भागात पिकात सातत्याने पाणी साचून असल्याने झाडांची मुळे कुजत आहेत. झाडे आपोआप वाळू लागली आहेत. काही भागात सूर्यप्रकाश न मिळाल्याने फळधारणेची शक्यता बरीच कमी झाली. आता पुन्हा पाऊस सक्रीय झाल्याने नुकसानाची पातळी वाढत आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com