Weather Forecast Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Weather Forecast Kolhapur : ‘तरण्या’ने तारलं; पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, ३३ बंधारे पाण्याखाली

Panchganga River Water Flood : पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी २५.९ फुटांवर गेली. जिल्ह्यातील एकूण ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Rain : मागच्या काही दिवसात शांत झालेल्या पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात २४ तासांत आठवडाभराची कसर भरून काढली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार आज रात्री उशिरापर्यंत कायम होती. धरण क्षेत्रात तर मुसळधार पाऊस कोसळत आहे. सध्या पुनर्वसू (तरणा) नक्षत्र सुरू असून ‘तरण्या’ पावसाचा जोर वाढल्याचे दिसून आले. दिवसभर सुरू राहिलेल्या पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी २५.९ फुटांवर गेली. जिल्ह्यातील एकूण ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान पुढची दोन दिवस पावसाची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, संततधार पावसामुळे जिल्ह्यात तीन घरांच्या भिंती कोसळून एक लाख ४० हजारांचे नुकसान झाले. यामध्ये नूल (ता. गडहिंग्लज) येथील भैरू कांबळे यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. राजाराम साळुंखे यांच्या घराची भिंत कोसळून ४० हजारांचे नुकसान झाले. शिंगणापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक आंबेवाडी-चिखली या पर्यायी मार्गे वळविली.

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुनर्वसू (तरणा) नक्षत्र लागले आहे; परंतु पावसाचा म्हणावा असा जोर दिसत नव्हता. रविवारी मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी सुरू झाली. दिवसभर संततधार पाऊस सुरू राहिला. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती.

राधानगरी, गगनबावडा, शाहूवाडी तालुक्यासह धरण क्षेत्रांत मुसळधार पाऊस झाला. भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, करवीरसह इतर तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पंचगंगा, ताम्रपर्णी, वेदगंगा, हिरण्यकेशी, दुधगंगा, कासारी, वारणा, भोगावती या नद्यांवरील ३३ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे फुटात : राजाराम २५.९, सुर्वे २६.२, रुई ५५, इचलकरंजी ५१.३, तेरवाड ४६.६, शिरोळ २६, नृसिंहवाडी ३३, राजापूर २०.९ तर नजीकच्या सांगली १८ व अंकली १८११ फूट अशी आहे.

धरणातील पाणी साठा (‘टीएमसी’मध्ये)

आलमट्टी- ९०.३३, कोयना - ३६.२३, राधानगरी - ४.५९, वारणा - १९.०७. तर राधानगरी धरणातून १ हजार ३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा टीएमसीमध्ये - तुळशी १.९२, वारणा १९.९०, दूधगंगा १०.५६, कासारी १.५६, कडवी १.८७, कुंभी १.३२, पाटगाव २.६५, चिकोत्रा ०.६४, चित्री १.२९, जंगमहट्टी १.०९, घटप्रभा १.५६, जांबरे ०.८२, आंबेआहोळ १.०४, सर्फनाला ०.२७ व कोदे लघु प्रकल्प ०.२१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ६३.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. तर मागच्या २४ तासात हातकणंगले १३.७, शिरोळ ६.५, पन्हाळा ३२.६, शाहुवाडी ६१, राधानगरी २८.३, करवीर १८.७, कागल १८.५, गडहिंग्लज १४.५, भुदरगड ४१.७, आजरा २८.३, चंदगड २४ असा एकूण २५.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam Water Release: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा, जायकवाडीतून ५ नोव्हेंबरपासून रब्बीतील पहिले आवर्तन

Ahilyanagar Karjmafi : अहिल्यानगरमध्ये ४३ हजार शेतकऱ्यांची कोंडी! कर्जमुक्तीची प्रतीक्षा कधी संपणार?

Farmer Loan Waiver : कर्जमाफीचा लाभ आत्तापर्यंत किती पात्र शेतकऱ्यांना मिळाला?

Strawberry Center Ware : थेट शेतातून ग्राहकांच्या हाती! वारे येथे स्वतंत्र स्ट्रॉबेरी केंद्राचे उद्घाटन, पर्यटकांची गर्दी

Farmer Issue: आधार प्रमाणीकरणानंतरही कर्जमुक्ती नाही

SCROLL FOR NEXT