Indian Agriculture : शेतकऱ्यांनो, आधी शेतीला श्रीमंत करा

Agriculture Experts Interview : अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन, मुक्तांगण मित्र आणि साधना साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ‘तीन शेतीतज्ज्ञांच्या मुलाखती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Pune News : जमिनीला श्रीमंत केले तरच त्या श्रीमंत जमिनीच्या जिवावर स्वतः श्रीमंत होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधी शेतीला श्रीमंत केले पाहिजे, असे आवाहन जळगावचे प्रयोगशील आणि शेतीद्वारे आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेले ज्येष्ठ शेतकरी विश्‍वासराव पाटील यांनी शनिवारी (ता. १३) येथे केले.

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशन, मुक्तांगण मित्र आणि साधना साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ‘तीन शेतीतज्ज्ञांच्या मुलाखती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील बोलत होते. या कार्यक्रमात फलटणच्या कृषी संशोधक चंदा निंबकर, पाटील आणि शेतकरी कंपनी चालविणारे सह्याद्री फार्मचे प्रणेते विलास शिंदे यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

Agriculture
Indian Agriculture : खाद्यतेल, डाळी आत्मनिर्भरतेचा मार्ग

ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी मुक्तांगण मित्रच्या सोनाली काळे, महाराष्ट्र फाउंडेशनचे सुरेश तलाठी आणि साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद सिरसाठ आदी उपस्थित होते.

विश्‍वासराव पाटील पुढे म्हणाले, की भूमातेलाही चौरस आहार दिला पाहिजे. मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. यासाठी एकाच शेतीतून पिकामागून पीक काढण्यापेक्षा तिचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शेतीला विश्रांतीसुद्धा दिली पाहिजे. पण आजचा शेतकरी विश्रांती हा शब्दच विसरून गेला आहे.

Agriculture
Indian Agriculture : शेती हाच जीवनाचा मूलाधार

या वेळी विलास शिंदे म्हणाले, ‘‘सध्या शेतकरी हा प्रपंच चालविण्यासाठी संघर्ष करीत आहे. शेतकऱ्याची आर्थिक दुरवस्था मोठी आहे. यातूनच आरक्षणासाठी सामाजिक लढा उभा राहिला आहे.

शेतीकडे भावनिकदृष्ट्या बघितले जाते. एका दाण्याचे हजार दाणे होतात हे स्वप्नवत आहे. जागतिक बाजारात शेती फायदेशीर करायची असेल, तर ती स्वतंत्र झाली पाहिजे. शेतीला शाश्‍वत विकास आणि उत्पन्न पाहिजे. ९० टक्के शेतकरी तीन एकरवाले आहेत. सन्मान आणि पैसे मिळाले तर लोक शेतीतून बाहेर पडणार नाहीत,’’

चंदा निंबकर म्हणाल्या, की नारी सुवर्णा मेंढीची जात विकसित केली. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश येथे या जातीची पैदास केली जाते. शेळ्यांची आनुवंशिकता सुधारण्याचे काम सुरू आहे.

शेळीसख्या तयार केल्या. ग्रामीण भागातील महिला दबलेल्या आहेत. पशू पैदास तंत्र परदेशात उत्तमप्रकारे चालवले जाते. आपल्याकडे हे काम थोडे आहे. गोहत्या बंदीचा विचार केला पाहिजे. नैसर्गिक मरणापर्यंत गायींना सांभाळणे शक्य नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com