Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Rain : कोल्हापुरात ‘पंचगंगे’ने इशारा पातळी ओलांडली

Rain Update : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत रविवारच्या (ता. २१) तुलनेत सोमवारी (ता. २२) पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी दोन्ही जिल्ह्यांत नद्यांच्या पाण्यात वाढ कायम होती.

Team Agrowon

Kolhapur / Sangli News : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत रविवारच्या (ता. २१) तुलनेत सोमवारी (ता. २२) पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी दोन्ही जिल्ह्यांत नद्यांच्या पाण्यात वाढ कायम होती. पंचगंगा नदीने सोमवारी सकाळी ३९ फुटांची इशारा पातळी ओलांडली असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले.

पाऊस वाढल्यास महापुराचा धोका असल्याने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. ‘अलमट्टी’तून दीड लाख क्युसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने दक्षिण महाराष्ट्राला दिलासा मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आठ राज्य मार्ग सोमवारी दुपारपर्यंत बंद आहेत. तर प्रमुख १६ महामार्ग बंद झाले. १४ ग्रामीण मार्गांवर पाणी आले असून २० रस्त्यांची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

राधानगरी धरणात ८२ टक्के, दूधगंगा धरणात ६१ वारणा धरणात ७७ तर तुळशी धरणात ७१ टक्के पाणीसाठा आहे. अजूनही धरणांतून पाणी फारसे सोडले जात नसल्‍याने सध्या पडणाऱ्या पावसामुळेच नद्यांची पाणीपातळी वाढत असल्याचे चित्र आहे. विविध ठिकाणचे मिळून ७८ बंधारे पाण्‍याखाली गेले आहेत. चंदगडमधील ७ लघू प्रकल्प भरले आहेत. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत शाहूवाडीत ९२ मिमी पावसाची नोंद झाली.

सध्या अलमट्टी धरणात १ लाख १५ हजार ४०६ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक होत असून १ लाख ५० हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक आणि अलमट्टी धरण व्यवस्थापनाशी चर्चा सुरू केली आहे. त्यामुळे पाण्याची आवक किती वाढते यावर विसर्ग वाढवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

सांगली, चिक्कोडी भागातील पूरस्थिती टाळण्यासाठी ‘आलमट्टी’तून विसर्ग वाढवला आहे. हिप्परगी बंधाऱ्याची सर्व दारे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे फुगवटा कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. सध्या हिप्परगी बंधाऱ्यावर पाणीपातळी ५२२ मीटर आहे. राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ३९ फूट असून सध्या या ठिकाणी पाणीपातळी ३८.८ फूट आहे. राजापूर बंधाऱ्यातूनही पाण्याचा विसर्ग वाढवला आहे.

दरम्यान, रविवारी अलमट्टी धरणात पाण्याची आवक वाढल्याने रविवारी पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होणार आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २२) सांगली पाटबंधारे विभाग आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी पाणी सोडण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पाण्याची आवक किती प्रमाणात वाढणार आहे, याचा अंदाज घेऊन विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT