Chhatrapati Sambhajinagar News: आठवड्यातील एक दिवस, रेशीम कोष उत्पादक, शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांचा ऑनलाइन संवाद व्हावा, शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळावे, नुकसानीचा विमा मिळावा, योजनांची पारदर्शक व गतीने अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा मंगळवारी (ता. २४) रेशीम चॉकी चालक, शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांच्या संवादातून पुढे आली..केंद्रीय रेशीम बोर्ड, वस्त्र मंत्रालय, भारत सरकार आणि रेशीम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएममधील आइन्स्टाईन सभागृहात अंडीपुंज कायदा जागरूकता कार्यक्रम पार पडला..Silk Milk Project: ‘सिल्क-मिल्क’ प्रकल्प अंतर्गत ११० शेतकऱ्यांची निवड.या कार्यक्रमाचा उद्देश नोंदणीकृत रेशीम अंडीपुंज उत्पादक, चॉकी चालक आणि अंडीपुंज कोष उत्पादक यांच्यामध्ये अंडीपुंज कायद्यातील तरतुदी तसेच गुणवत्ता मानकांबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. तसेच नव्याने विकसित तंत्रज्ञान, पसाराविषयक बाबी आणि अंडीपुंज व कोष उत्पादनातील विविध आव्हानांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय रेशीम बोर्डाचे शास्त्रज्ञ डॉ. अंकुश गाडगे, प्रादेशिक रेशीम कार्यालय अमरावतीचे सहायक संचालक हेमंत लाडगावकर, .Silk Farming: रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ.कोल्हापूरचे रेशीम विकास अधिकारी भगवान खंडागळे, छत्रपती संभाजीनगरचे रेशीम विकास अधिकारी बी. डी. डेंगळे, महिकोचे प्रशांत भावरीकर, श्रीमती भारंबे आदींची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, यवतमाळ, बुलडाणा, नाशिक, अहिल्यानगर आदी जिल्ह्यांतून चॉकी चालक विजय पाटील, भाऊसाहेब निवदे, रवींद्र राऊत आदींनी समस्यांवर प्रकाश टाकला. महाराष्ट्र सिल्क असोसिएशनचे राजेश उर्कुडे यांनीही सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. सूत्रसंचालन क्षेत्र सहायक अभिमान हाके यांनी मानले..रेशीम चॉकी चालकांनी नव तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. सोबतच रेशीम उद्योगाशी जोडलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला विकसित करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे.- हेमंत लाडगावकर, प्रादेशिक सहसंचालक, अमरावती.चॉकी चालक यांनी अंडीपुंज अधिकृत ठिकाणावरूनच घ्यावे. अंडीपुंज उत्तम असले तर रेशीम उद्योग यशस्वी होण्यास हातभार लागेल.- भगवान खंडागळे, रेशीम विकास अधिकारी, कोल्हापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.