Panchaganga Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Panchaganga Sugar Factory : पंचगंगा कारखान्याच्या संचालक मंडळाकडून कोट्यावधींचा गैरव्यवहार, माजी अध्यक्षांचा आरोप

Rajani Magdum : गेल्या १८ वर्षांत सत्ताधारी संचालक मंडळाने कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी केला.

sandeep Shirguppe

Panchaganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक अहवालात डिस्टिलरी, पेट्रोल पंप, को-जनरेशन, सांस्कृतिक हॉलचा नफा अल्प दाखवला आहे. कार्यकारी संचालकाच्या नावे १५ लाखांचा प्रवासखर्च कसा झाला. कारखाना मालकीची हातकणंगले, कुरूंदवाड, बोरगाव आणि शहापूर येथील ७० एकर जमीन विक्री करून त्यांची काय विल्हेवाट लावली, सभासदांच्या ३७ कोटी ठेवी अहवालातून गायब झाल्या आहेत. याचा खुलासा १५ सप्टेंबरच्या वार्षिक सभेत करावा. गेल्या १८ वर्षांत सत्ताधारी संचालक मंडळाने कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम यांनी केला. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

मगदूम म्हणाल्या की, ‘देशभक्त आण्णांचे वारस कारखान्यात नको असे सांगणाऱ्या अध्यक्षांनी स्वतःच्या मुलाला संचालक मंडळात कशासाठी घेतले आहे. जन्मगाव निमशिरगाव येथे अडीच एकरात आण्णांचे स्मारक होत आहे. त्याला कारखान्याकडून रुपयाचा ही निधी नाही.

विद्यमान अध्यक्ष पी. एम. पाटील गेली १८ वर्षे कारखाना सांभाळत आहेत. कारखान्याची सर्व प्रकारची टेंडर संचालक मंडळाच्या नातेवाइकांना दिली जातात. डिस्टिलरी, सांस्कृतिक हॉल भाडेतत्त्वावर दिले. त्यांचा नफा कुठे गेला, पेट्रोल पंपाच्या नफ्याचे काय झाले.? भाडेतत्त्वावर असलेल्या रेणुका शुगरकडून मयत सभासदाची साखर उचल करून ती परस्पर विक्री केली जाते.

सभासदाच्या मालकीच्या कारखान्याचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारखान्याचे सभासद तो हाणून पाडतील.’ शिरोळचे माजी सभापती भोला कागले, आण्णासो शहापुरे, अशोक पाटील, सुकुमार पाटील, रायगोंडा पाटील, निमशिरगावचे माजी सरपंच शिवाजी कांबळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari Irrigation Reform: थकबाकी वसुली, स्वायत्तता अजेंड्यावर

Well Approval Irregularities: पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिली परस्पर ३७ विहिरींना मंजुरी

Grape Vineyard Destroyed: उभ्या द्राक्ष बागेवर माथेफिरूकडून कुऱ्हाड

Transport Business Issue: ट्रान्सपोर्ट व्यवसाय ‘व्हेंटिलेटर’वर

Tree Cutting Ban: नाशिकमध्ये वृक्षतोडीला २८ एप्रिलपर्यंत स्थगिती

SCROLL FOR NEXT