Rahibai Popere  Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Rakhi : पद्मश्री राहीबाईं पोपेरेकडून यंदाही चंद्रकांत पाटलांना बीज राखीची भेट

Rahibai Popere : अकोले तालुक्याच्या दुर्गम भागातील कोंभाळणे येथील राहिबाई पोपेरे गेल्या अनेक वर्षांपासून विविध देशी बियाणांचे जतन आणि संवर्धन करतात.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : वेगवेगळ्या देशी बियाणांचे संवर्धन करणाऱ्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना यंदाही वेगवेगळ्या देशी बियांपासून तयार केलेली बीज राखीची भेट दिली आहे.

अकोले तालुक्याच्या दुर्गम भागातील कोंभाळणे येथील राहिबाई पोपेरे गेल्या अनेक वर्षांपासून विविध देशी बियाणांचे जतन आणि संवर्धन करतात. केंद्र शासनाच्या पद्मश्री पुरस्कारासह अन्य शासनाच्या विविध पुरस्काराने त्यांना गौरवले आहे.

राहीबाई यांच्या बीजबॅंकेसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांना राहीबाई दर वर्षी राखी भेट देतात. यंदाही राहिबाई यांनी भात, नागली, वरई, काकडी, भोपळा, तूर, मूग, उडीद, वाल, काकडी, घोसाळी, डांगर भोपळा यांसह विविध देशी बियांपासून तयार केलेली राखी भेट दिली आहे.

राहीबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व त्यांचा आदर राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे. यंदा त्यांनी भावांसाठी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली आहे.

त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठीन ‘एक धागा राष्ट्रबांधणी’चा या मोहिमेअंतर्गत या राख्या बनवल्या असल्याचे सांगितले आहे. जवानांसाठीसुद्धा त्यांनी बीज राख्या भेट म्हणून सीमेवर पाठविल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT