Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : भंडारा जिल्ह्यात धान नोंदणीला ३१ पर्यंत मुदत

Paddy Registration Extension of Time : शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता नोंदणीला रविवार (ता.३१) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Bhandara News : शासकीय धान खरेदी केंद्रांवर धानाची विक्री करणे व त्या माध्यमातून बोनसचा लाभ घेण्यासाठी नोंदणी सक्‍तीची करण्यात आली आहे. सुरुवातीला सोमवार (ता.१५) पर्यंतच नोंदणी करता येत होती. मात्र शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता नोंदणीला रविवार (ता.३१) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने हमीभावाने धान खरेदी केली जाते. त्याकरिता शासन निर्णयानुसार केंद्र उघडण्यात येतात.

मात्र या केंद्रावर विक्रीसाठी धान नेण्यापूर्वी शेतकऱ्यांना एनईएमएल या पोर्टलवर नोंदणी करावी लागते. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच धानाची खरेदी होते. खरीप हंगामातील धानाची विक्री करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणीची प्रक्रिया केली.

मात्र त्यानंतर देखील अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित होते. त्यातच सोमवार (ता.१५) नोंदणीची मुदत संपल्याने त्यांची चिंता वाढली होती. शेतकऱ्यांची ही अस्वस्थता लक्षात घेत शासनाने धान उत्पादकांना नोंदणी करीता रविवार (ता.३१) पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

बोनसकरिता नोंदणी अनिवार्य

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धानाला प्रती हेक्‍टरी २० हजार रुपयांपर्यंत बोनस देण्याची घोषणा केली होती. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. परिणामी नोंदणीस मिळालेली मुदतवाढ दिलासादायक ठरली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Groundwater Rise: अकोला जिल्ह्याच्या भूजल पातळीत झाली १.१९ मीटरने वाढ

Dairy Success: वैभवच नव्हे, रोजची शांत झोप मिळवली 

Cotton Procurement: ‘सीसीआय’कडे वाढला शेतकऱ्यांचा कल

Rabi Crop Sowing: रब्बी पेरणी १२ टक्क्यांनी आघाडीवर, गहू सर्वाधिक, 'या' कारणांमुळे अधिक क्षेत्र पिकांनी व्यापले

Solapur KVK: ‘केव्हीके’च्या तंत्रज्ञान प्रसारातून वाढली उत्पादकता

SCROLL FOR NEXT