Paddy Production Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Production : रत्नागिरीत भात उत्पादन घटणार

Team Agrowon

Ratnagiri News : यंदा पावसाचा लहरीपणा, खंड, असमान वितरण आणि सुरुवातीपासून रुसलेला पाऊस यामुळे यंदा खरिपातील भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. जुलैच्या मध्यापासून आतापर्यंत कोकण किनारपट्टी भागात दमदार पाऊस झाला असला तरी त्यात सातत्य नव्हते.

जून आणि ऑगस्ट हे खरिपाचे महत्त्वाचे महिने तर कोरडेच गेले. यामुळे यंदा खरिपात उत्पादन किमान १५ ते २० टक्के घटण्याची शक्यता आहे. याला कृषी विभागाकडूनही दुजोरा मिळाला आहे.

या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीला बसणार आहे. पावसाची अनियमितता आणि पाण्याअभावी भातरोपांना अधिकचे फुटवे आलेले नाहीत. काही ठिकाणी रोपांची उंचीच वाढलेली नाही. कातळावरील रोपे पिवळी पडल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. मात्र, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने ही भात शेती काही प्रमाणात तारून नेली.

ऑगस्टपाठोपाठ सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने पाठच फिरवली. त्या नंतर कडकडीत उन्हाने भातशेती जणू करपत होती. अनियमित पावसामुळे पुरेसे पाणी भातरोपांना मिळाले नाही. त्यामुळे रोपांची वाढ झाली नाही.

यंदा जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. त्या नंतर जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी भातलावण्यांची कामे पूर्ण केली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारल्याने लावण्या झालेल्या भात खाचरांची स्थिती चिंताजनक होती. कातळावरील भातरोपे पिवळी पडली.

रत्नागिरी जिल्ह्यात ६१ हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस झाला. मात्र, मोक्याच्या वेळी पावसाने पाठ दाखविल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत भात शेतीबरोबरच नाचणी पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची भीती आहे. बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक परिणाम हळव्या बियाण्यावर सर्वाधिक होत आहे.

कोकणात हे क्षेत्र जवळपास ३२ हजार हेक्टरहून अधिक आहे. काही भागात वरकस जमीन अधिक असल्यामुळे येथील उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती कृषी विभागाकडून व्यक्त केली जात आहे. सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसाने गरवी किंवा निमगरवी भातबियाण्यांची स्थिती सुस्थितीत होती. त्यामुळे ६० ते ६५ टक्के तरी उत्पादन यंदा शेतकऱ्यांच्या गाठीशी राहणार आहे.

कातळावरील किंवा पाण्याचाअभाव असेलली रेताड जमिनीतील भातशेती अडचणीत सापडली आहे. काही भागात पावसाअभावी आणि वाढलेल्या तापमानाने शेते पिवळी पडली. रोपांचे शेडे करपून गेले. फुटवा कमी आल्यामुळे यंदा जिल्ह्याचे भात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादकतेवरही परिणाम होण्याची भीती आहे. भाताची हेक्टरी उत्पादकता ३२ क्विंटल आहे. मात्र, यंदा ती कमी होण्याची भीती आहे.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT