Paddy Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : खेडच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडी अंतिम टप्प्यात

Paddy Farming : भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहे.

Team Agrowon

Pune News : भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहे. दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. भातखाचरांमध्ये पाणी साचले असल्याने लागवड झालेली भातरोपे तरारली आहेत.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वाडा, तिफनवाडी, वाळद, आव्हाट, खरोशी, धुवोली, मंदोशी, टोकावडे, भोरगिरी या सह सर्वच भागात खरीप हंगामात जवळपास सर्वच ठिकाणी भातलागवड केली जाते. या पट्ट्यात ३३०० हेक्टरवर भाताची लागवडी होते.

चालू वर्षी सुरवातीला वरुणराजाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी वेळेवर भातरोपे तयार करण्यासाठी साळीची पेरणी केली. भातरोपे तयार झाल्यावर पावसाने ओढ दिल्याने भातलागवडी रखडल्या.

मात्र त्यानंतर कमी अधिक पडणाऱ्या पावसाने भात लागवडींना वेग आला. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून दमदार व संततधार पाऊस कोसळल्याने भातलागवडी वेगाने सुरू होत्या.

काहीशी उसंत मिळणार

सद्यःस्थितीत खेड तालुक्याच्या सर्वच भागात भात लागवडींना अंतिम टप्प्यात आल्या असून लागवडीसाठी भातखाचरांमध्ये ट्रॅक्टरबरोबरच बैलांचा वापर होत असून भातलागवडी झाल्यानंतर बळीराजाला काहीशी उसंत मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT