Paddy Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : खेडच्या पश्चिम पट्ट्यात भात लागवडीची लगबग

Kharif Paddy : भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडी करण्यास वेग आला आहे.

Team Agrowon

Pune News : भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडी करण्यास वेग आला आहे. लागवड करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भात खाचरातील चिखलणीसाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरच्या साह्याने भातखाचरे तयार केली जात आहेत.

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात जवळपास ३३०० हेक्टर क्षेत्रावर भातलागवड केली जाते. सरासरी २००० ते २२०० मिलिमीटर सरासरी पाऊस पडणाऱ्या तालुक्याच्या या पश्चिम पट्यात यंदा वर्षी वरुणराजाने कृपादृष्टी दाखवत शेतकऱ्यांना समाधानी व आनंदित केले आहे.

खरीप हंगामात भाताचे पीक हे मुख्य असल्याने भाताची लागवड ही महत्त्वाची असते. भाताच्या लागवडीसाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने या भागात भाताचे पीक प्रात्याक्षीक प्लॅाट घेण्यात आलेले असून पारंपारिक लागवडीबरोबरच चारसूत्री भाताची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत असल्याने गेल्या काही वर्षात भाताचे उत्पन्न वाढले आहे.

गेली काही वर्षांपासून भातलागवडीसाठी भात खाचरात आवश्यक असणारा चिखल करण्यासाठी ट्रॅक्टरच्या मोठ्या चाकांना लोखंडी चाके तयार करून त्यासाह्याने चिखल केला जात आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे बैलांना होणारा त्रास तसेच भातखाचरे तयार करण्यासाठी लागणारा वेळ या दोन्हींमध्ये बचत होत असून लागवडी वेगात होत आहेत.

प्रगतशील शेतकरी लक्ष्मण काठे म्हणाले, ‘‘बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखलणी करण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागत असून लागवडीही वेगाने होते. बैलाची कमतरता तसेच लागणारे मनुष्यबळ कमी पडत असल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करणे सोपे झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT