Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : मॉन्सूनोत्तर पावसाच्या भीतीने भातकापणीस जोर

Post Monsoon Rain : पालघर जिल्ह्यात खरिपाचे हळवे भातपीक कापणीला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर हिटमुळे जमीन उकलून भेगा पडू लागल्या आहेत.

Team Agrowon

Latest Agriculture News : पालघर जिल्ह्यात खरिपाचे हळवे भातपीक कापणीला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबर हिटमुळे जमीन उकलून भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे गरव्या पिकाला एका दमदार पावसाची अपेक्षा आहे; तर हळवे भातपीक परिपक्व झाल्याने शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली. त्यातच हवामान खात्याने कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला.

ग्रामीण तालुक्यात खरिपाच्या पिकावर आदिवासी बांधव वर्षभर गुजराण करतात. आता खरिपाचे हळवे भातपीक परिपक्व होऊन कापणीस तयार झाल्याने, काही भागातील शेतकऱ्यांनी त्याची कापणीस सुरुवात केली.

त्यामुळे शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गरव्या भात पिकाचे लोंब बाहेर पडू लागले आहेत. ते परिपक्व होण्यासाठी एका दमदार पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे गरवे भात केलेले शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

हवामान खात्याच्या पावसाच्या अंदाजामुळे चिंता

परिपक्व झालेले हळवे भात पीक कापणीला सुरुवात झाली आहे; तर गरवे भात पीक फुलोऱ्यात आले आहे. या पिकाला एका पावसाची आवश्यकता आहे, तसेच हळवे भात पीक कापून शेतकरी शेतात ठेवत आहेत. पाऊस आल्यास कापून ठेवलेले पीक कुजून जाण्याची भीती आहे. त्यातच हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.

या वर्षी हळवे भातपीक चांगले आले आहे. आम्ही कापणी केलेल्या पिकाची पाहणी केली. ७५ टक्क्यांहून अधिक उतारा येत असल्याचे दिसत आहे; मात्र गरवे पीक आता लोंब बाहेर टाकत आहे. ते परिपक्व होण्यासाठी एका पावसाची अपेक्षा आहे.
- ए. एल. साळुंखे, मंडळ कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT