Paddy Crop : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ हजार हेक्टरवरील भातपीक संकटात

Paddy Crop In Crisis : सतत पडणाऱ्या पावसामुळे या पिकांची कापणी करता येत नसल्यामुळे शेतकरी हतबल असून आतापर्यंत अवघ्या दोन हजार हेक्टरवरील कापणी पूर्ण झाली आहे.
Paddy crop
Paddy cropAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरवरील भातपीक संकटात सापडले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे या पिकांची कापणी करता येत नसल्यामुळे शेतकरी हतबल असून आतापर्यंत अवघ्या दोन हजार हेक्टरवरील कापणी पूर्ण झाली आहे. तर दुसरीकडे वादळी पावसाने झालेल्या नुकसानीची सूचना देण्यातदेखील अडथळे येत आहेत.

खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक लागवड केली जाते. हळवा, निमगरवा आणि गरवा अशा भातवाणांची लागवड साधारणपणे जिल्ह्यात केली जाते. यावर्षी दरवर्षीच्या तुलनेत मॉन्सून लांबला आणि त्याचा मोठा परिणाम खरीप हंगामावर दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातील उत्पादन खूपच कमी येणार आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Paddy crop
Paddy Harvesting : हळव्या भात पिकाच्या कापणीला जोर

परंतु ऑगस्टमध्ये पाऊस झाल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील भातपिकांना जीवदान मिळाले. जिल्ह्यात साधारणपणे ११ हजार ९०० हेक्टरवर हळव्या पिकांची लागवड करण्यात आली आहे. ही पिके गणेशोत्सवापूर्वीच म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परिपक्व झाली. त्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवरील भातपीक परिपक्व स्थितीत आहे.

Paddy crop
Paddy Procurement : केंद्राशी झालेल्या चर्चेनंतर बासमती तांदूळ निर्यातदारांचा संप मागे, धानाची खरेदी सुरू

परंतु सप्टेंबरच्या अखेरीपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे उभी पिके आडवी झाली. पाणथळ जमिनीतील पिकांची अवस्था तर बिकटच आहे. जिल्ह्यातील साधारणपणे १५ हजार हेक्टरवरील भातपीक नुकसानीच्या उंबरठ्यावर आहे. अजूनही पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे भातपिकांचे नुकसानदेखील वाढण्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात हळवी पिके कापणीला आली आहेत. परंतु पावसामुळे शेतकऱ्यांना पूर्णवेळ कापणी करता येत नाही. पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी भातपिकांचे क्षेत्र सरंक्षित केले आहे, त्यांनी नुकसानीची ऑनलाईन सूचना विमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत नोंदवावी.
- अरुण नातू, तांत्रिक अधिकारी, जिल्हा कृषी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी
ढगफुटीसदृश पावसामुळे माझ्या चार हेक्टर भातपिकांपैकी १ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले. यासंदर्भात विमा कपंनीकडे सूचना देण्यासाठी कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही.
- मनवेल फर्नांडिस, भात उत्पादक शेतकरी, सोनुर्ली, ता. सावंतवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com