Paddy Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर भात कापणीचे वेध

Paddy Crop : पालघर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी सध्या भात कापणी कामाला सुरुवात होण्याच्या वाटेवर आहे.

Team Agrowon

Wangaon News : पालघर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी सध्या भात कापणी कामाला सुरुवात होण्याच्या वाटेवर आहे. नवरात्रोत्सवात सध्या खरिपातील हळवे भातपीक कापणीला तयार होत असून पूर्वतयारीला शेतकरी वर्ग लागला आहे. नवरात्रोत्सव संपण्याच्या आधी हळवे भात कापून घेण्याचा प्रयत्न शेतकरी वर्गाचा आहे.

सध्या हळवी भातशेती कापणीला तयार झाली आहे. काही ठिकाणी भात कापणीला सुरुवातदेखील करण्यात आली आहे. परतीच्या पावसाने यंदा काही भागात भात शेतीचे नुकसान झाल्याचे आढळून आले, तरीही यंदा भात शेतीपासून चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे, असे शेतकरी सांगतात. गेल्या हंगामापेक्षा यंदा सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात भातलागवड झाली आहे.

यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने उग्ररूप धारण केल्यामुळे कापणीला तयार झालेली भातशेती जमीनदोस्त झाली आहे. वाऱ्याचा वेगदेखील जास्त असल्याने भातशेती खाचरात आडवी झाली आहे. हातातोंडाशी आलेले पीक निघून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे.

सरकारने नुकसानीचा गांभीर्याने विचार करून त्वरित पंचनामे करावेत आणि न्याय मिळवून द्यावा, असे शेतकरी सांगत आहेत. शेतकऱ्यांनी बुरशीजन्य रोग तसेच अळ्या, किडी यांच्याबाबतीत दक्ष राहावे. असे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

लोहारांच्या दुकानात गर्दी

ग्रामीण भागातील शेतकरी विळ्याच्या सहाय्याने भात कापणी करतात. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी जुने ठेवणेतील विळे, कोयते लोहाराच्या दुकानात आणून देत असून त्याला पुन्हा धार लावून घेत आहेत. या कामासाठी अनेक गाव-खेड्यांतून शेतकरी वर्ग लोहाराच्या दुकानात गर्दी करीत आहेत.

पीक नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांना आदेश देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक यांना कळवावे. भात पीक विमा उतरविला आहे, त्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण विमा कंपनीमार्फत केले जाईल.
- रवींद्र पाचपुते, कृषी अधिकारी
भाताच्या लोंब्यामधील ९० टक्के दाणे पक्व झाल्याचे दिसताच कापणी जमिनीलगत वैभव विळ्याने करावी. त्यामुळे पुढील हंगामासाठी खोडकिडीवर नियंत्रण मिळवता येईल. यंत्राच्या साहाय्याने कापणी केल्यास वेळेत आणि खर्चातही बचत होऊ शकते.
- डॉ. भरत कुशारे, कृषी विज्ञान केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT