Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील भात कापणी पूर्ण

Paddy Farming : ढगाळ वातावरणामुळे सकाळी भात कापणी करून दुपारी सुकवून सायंकाळी सुरक्षित ठिकाणी रचून ठेवला जात आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : जिल्ह्यात नवरात्रीचा उत्सव साजरा होत असताना शेतकऱ्यांची भात कापणीची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात साधारपणे ४ हजार हेक्टरवरील हळवी बियाण्यांची कापणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

अवकाळी पावसाच्या तडाख्यात भात पीक सापडू नये यासाठी बळीराजाची कसरत सुरू आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळी भात कापणी करून दुपारी सुकवून सायंकाळी सुरक्षित ठिकाणी रचून ठेवला जात आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मौसमी पावसाने पूर्णतः माघार घेतल्यानंतर तयार झालेल्या भाताच्या कापणीस सुरुवात झाली आहे. रत्नागिरी तालुक्यात पावस परिसरासह आजुबाजूच्या ठिकाणी हे चित्र आहे.

तर राजापूर तालुक्यात शिळसह कातळ भागाताील भातशेतांमध्ये शेतकरी राजा कापणीची कसरत करत आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापुरात पाऊस झाला. त्यामुळे भात कापणीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. मंगळवारी (ता. १७) सकाळच्या सत्रात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने बळीराजा धास्तावला होता.

काहींनी कापणी थांबली होती. परंतु दुपारी ऊन पडल्यामुळे पुन्हा शेतीच्या कामांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान, कृषी विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार हेक्टरवरील कापणी पूर्ण झाली आहे.

यावर्षी ४६ हजार हेक्टरवर भात लागवड झाली आहे. दरवर्षी सुमारे ६८ हजार हेक्टवर पीकलागवड होते; परंतु यंदा झालेल्या ऑनलाईन ई-पिक नोंदणीच्या अहवालानुसार २० हजार हेक्टरची तूट आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT