Paddy Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : कळंबामध्ये भात कापणीला सुरुवात

Paddy Farming : वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे कळंबा शेती गटांतर्गत चाळीस गावांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात भाताचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Kolhapur News : वरुणराजाच्या कृपादृष्टीमुळे कळंबा शेती गटांतर्गत चाळीस गावांमध्ये यंदाच्या खरीप हंगामात भाताचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे चित्र आहे. १ हजार ७५६ हेक्टरमध्ये भात पिके तरारली आहेत.

दरम्यान शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे. पावसाने शिवारात पाणी साचले असून चिखल गुट्ट्यासारखी अवस्था झाली आहे. मजुरांची टंचाई व पावसाने भाताचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी कुटुंबासमवेत राबताना दिसत आहेत.

कळंबा, कात्यायनी, हणबरवाडी, गिरगाव, पाचगाव, कंदलगाव, खेबवडे, जैताळ, चुये, कावणे, निगवे, निगवे खालसा, कणेरी, कणेरीवाडी, मोरेवाडी, उजळाईवाडीसह चाळीस गावांमध्ये शेतकऱ्यांनी १ हजार ७५६ हेक्टरमध्ये भात पिकाची लागवड केली आहे.

पिकांची उगवणूक चांगली होऊन व उत्पन्न वाढीसाठी घरचेच संकरित बियाणे पेरणीसाठी वापरले आहे. अनेक ठिकाणी भात पीक काढणीला व फुलोऱ्यात आले आहे. दरम्यान चार दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतात पाणी साचले आहे. कृषी विभागाने बांधावर जाऊन खरीप हंगामात पेरणीसाठी संकरित घरचेच बियाणे वापरावे यासाठी प्रबोधन केले. त्यामुळे यंदा भाताचे विक्रमी उत्पादन होणार असल्याचे दिसत आहे.

पंधराहून अधिक वाण

कळंबा शेती गटाअंतर्गत यंदा हंगामात जया, रत्नागिरी २४, कोलम, शुभांगी, आर वन, सह्याद्री, बासमती, वाडाकोलम, फुलेराधा, कर्जत चार, अंबिका, तेरणा, कर्जत तीन, आरपी ४/१४, वायएसआर, सुवर्णा, दारणा, बासमती ३७०, कुसा बासमती, इंद्रायणी, भोगावती, फुले समृद्धी यासह पंधराहून अधिक जातीचे संकरित बियाणे शेतकऱ्यांनी वापरले आहे.

सेंद्रिय खतांचा वापर

शेतकऱ्यांनी यंदा शेत शिवारात शेळ्या-मेंढ्या बसवून लेंडीखत मिळवले. शेणखताचा वापर केला आहे. त्याचबरोबर कळंबा तलावातील गाळ शेतात पसरला. त्यामुळे खरिपात भातासह अनेक पिकांची वाढ चांगली झाली आहे.

पेरणीसाठी शेतकऱ्यांनी संकरित बियाण्यांचा वापर केला आहे. तसेच यंदा शेतीपूरक पाऊस पडला आहे. त्यामुळे भात पिकासह अन्य खरिपातील पिकांची चांगली वाढ झाली आहे.
- नामदेव गिरी गोसावी, कृषी सहायक
यंदाच्या खरीप हंगामामध्ये भात पिकाची चांगली उगवणूक झाले आहे. त्यामुळे विक्रमी उत्पादन होणार असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
- भिकाजी चव्हाण, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT