Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Cultivation : पसुरे परिसरातील भात लावण्या लांबणीवर

Paddy Farming : भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यात दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पसुरे व परिसरातील भात लावण्या लांबणीवर पडल्या आहेत.

Team Agrowon

Mahude News : भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यात दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पसुरे व परिसरातील भात लावण्या लांबणीवर पडल्या आहेत.

जुलै महिना अर्धा संपला असला तरी म्हणावा, असा पाऊस पडला नाही. मागील काही दिवसांत पश्चिम भागात पडलेल्या पावसामुळे भात लवणीस सुरुवात झाली होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.

विशेष करून माळरानांवरील व डोंगर उतारावरील भात खाचरातील पाणी आटले आहे. यामुळे पाण्याअभावी लावण्या लांबणीवर पडल्या असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

ज्यांनी भात रोपे काढली होती, असे शेतकरी कसेबसे वाहळांचे पाणी घेत लावणी करीत आहेत. दोन दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने लावणीसाठी आवश्यक असलेले पाणी खाचरात नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पावसाच्या पुनरागमनाकडे लागले आहे.

पाऊस गेल्याने लावण्या रखडल्या असून रोपांची वाढ होऊनही रोपांची लागवड योग्य वेळी झाली नाही तर उत्पादनात घट होऊ शकते‌. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असल्याचे पसुरे येथील आकाश भालघरे, गुणाबाई मोरे, संदीप आंबेकर व सुरेश जंगम यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT