Paddy  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Cultivation : भात लागवडी उरकल्या

Team Agrowon

Pune News : यंदा जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे भात लागवडीला चांगलाच वेग आला होता. आता जवळपास सर्वच भागात भात लागवडी उरकल्या असून पुणे जिल्ह्याच्या भातपट्ट्यात सरासरीच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी ५८ हजार ६२६ हेक्टर म्हणजेच ९८ टक्के भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. सध्या भात पट्ट्यात होत असलेल्या तुरळक पावसामुळे भात पिकाची वाढ जोमदार असून पीक परिस्थिती चांगली आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे रखडलेल्या भात लागवडीला वेग आला होता. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून मजुरांच्या टंचाई असताना इर्जिक पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने भात लागवडी केल्या आहेत.

जूनच्या पहिल्या आठवड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी झाल्या होत्या. त्यानंतर सात जूनच्या दरम्यान मॉन्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात रोपे टाकण्यास सुरुवात केली होती. जवळपास २० ते २५ दिवसांत भात रोपे लागवडीस आली.

लवकरच चांगला पाऊस होण्याच्या आशेने शेतीकामांनी वेग घेतला होता. त्यातच एक जुलैनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने या भात पट्ट्यातील तालुक्यात जोरदार पाऊस पडला. विशेषतः धरणक्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने भात खाचरे तुडुंब भरली होती. त्यातच नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने धरणातील पाणीपातळीतही वाढ झाली. झालेल्या पावसामुळे भात लागवडीतील अडथळा कमी झाल्याने शेतकऱ्यांनी वेगाने भात लागवडी केल्या.

पुणे जिल्ह्यातील सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जातात. या परिसरातील अनेक कुटुंबे भात शेतीवरच अवलंबून आहेत. यंदा लवकर पाऊस न झाल्यास खरीप हंगाम वाया जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु मॉन्सून वेळेवर दाखल झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला. त्यामुळे भात उत्पादकांची चिंता कमी झाली.

भाताच्या विविध वाणांच्या लागवडी :

दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी आंबेमोहोर, साळ, दोडकी, कोलम, इंद्रायणी या पारंपरिक भात बियाण्यांच्या लागवडी करत आहेत. त्यासोबत कोकणी, पार्वती, फुले समृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी, व तृप्ती अशा संकरित विकसित भात बियाण्यांच्या वाणांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पश्चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोलम आणि इंद्रायणी या भाताची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मावळसह भोर, मुळशी तालुक्यात पारंपारिक चारसुत्री, अभिनव पट्टा पद्धत, एसआरटी व इतर पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांनी भात लागवड केली आहे.

तालुकानिहाय झालेली भात लागवड, हेक्टरमध्ये

तालुका --- सरासरी क्षेत्र -- भात लागवड -- टक्के

हवेली --- २०६४ --- १९४० -- ९४

मुळशी -- ७६६९ -- ७४११ -- ९७

भोर -- ७३८३ --- ७६१० --- १०३

मावळ ---- १२,१२५ --- ११९०० -- ९८

वेल्हे --- ५०१८ --- ४६०८ -- ९२

जुन्नर --- ११,६२९ --११६६० --१००

खेड --- ७२८६ -- ६८१५ -- ९४

आंबेगाव -- ५२४२ -- ५३४३ -- १०२

पुरंदर -- १२०८ --- १२४१ -- १०३

दौंड -- ३ --- ९६ -- ३२००

एकूण -- ५९,६२७ -- ५८,६२६ ---९८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT