Paddy Plantation Agrowno
ॲग्रो विशेष

Paddy Plantation : पावसामुळे भात लागवडीला वेग

Kharif Paddy : आत्तापर्यंत भाताच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी २२४ हेक्टरवर भात लावणी झाली आहे.

Team Agrowon

Pune News : गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलक्या सरी बरसत आहेत. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे भात लागवडीला सुरवात झाली आहे. आत्तापर्यंत भाताच्या ५९ हजार ६२७ हेक्टरपैकी २२४ हेक्टरवर भात लावणी झाली आहे. अशीच स्थिती राहिल्यास येत्या काळात भात लागवडीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

जूनच्या सुरवातीला जिल्ह्याच्या भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर, हवेली या तालुक्यांत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी भात रोपे टाकली होती. तर काही शेतकऱ्यांची एसआरटी पद्धतीने लागवडीसाठी लगबग सुरू झाली होती. लवकरच चांगला पाऊस होईल, म्हणून या आशेने शेतीकामांनी वेग घेतला होता.

परंतु काही प्रमाणात भात लागवडी झाल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. मागील काही दिवसांपासून भात पट्ट्यातील तालुक्यांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे भात खाचरे भरली. धरणांतील पाणीपातळीतही वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा भात लागवड करण्यास सुरवात केली आहे.

जिल्ह्यातील सात ते आठ तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जातात. त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. उशिरा का होईना पाऊस झाल्याने भात उत्पादकांची चिंता कमी झाली आहे.

तालुकानिहाय झालेली भात लागवड (हेक्टर)

तालुका---भात लागवड

भोर---६०

मावळ---५०

वेल्हे---५७

आंबेगाव---११

दौंड---२२

पुरंदर---२३

एकूण---२२४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT