Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाने भाताचे नुकसान

Rain Update : कापणी केलेल्या भाताच्या मळणीत पाणी साचल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काळम्मावाडी धरण क्षेत्रात दोन तासांतच तब्बल ७८ मिलिमीटर पाऊस झाला.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : जिल्ह्यात बुधवारी (ता. ८) झालेल्या पावसाने उशिरा पेर केलेल्या भात कापणीला मोठा फटका बसला आहे. विशेष करून पश्‍चिमेकडील तालुक्यांमध्ये भात पिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कापणी केलेल्या भाताच्या मळणीत पाणी साचल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

काळम्मावाडी धरण क्षेत्रात दोन तासांतच तब्बल ७८ मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरी धरण क्षेत्रावर २० मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.

पावसाचा ऊस पिकासाठी फायदा होणार असला, तरी कापणीला आलेल्या भात पिकाचे आणि साहजिकच कापलेल्या, मळलेल्या भाताच्या पिंजराचे मात्र मोठे नुकसान झाले. मळलेल्या भाताला वाळविणे व वारा देण्याच्या कामांनाही फटका बसला आहे.

शेतकरी आर्थिक संकटात

चंदगड तालुक्यातील नेसरीसह परिसरात अवकाळी पावस झाल्याने हातातोंडाला आलेल्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये कापणी, मळणी, कापणीला आलेल्या भातासह गवताचे मोठे नुकसान झाले.

पावसाने झोडपल्याने कापून पडलेल्या भाताच्या लोंब्या झडल्या आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेती करावी की पडपाडावी, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT