Ratnagiri News : जिल्ह्यात भात कापणीची लगबग सुरू झालेली असतानाच वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या उभ्या पिकांच्या नुकसानीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील शेतकऱ्याच्या सुमारे १० गुंठे भातशेतीचे रानडुकरांनी नुकसान केले.
जंगलातून झुंडीने आलेल्या रानडुकरांनी पिके आडवी केली. वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. हे प्रकार राजापूर, मंडणगडसह रत्नागिरीतही कमीअधिक प्रमाणात घडत आहेत.
ऑक्टोबरच्या सुरुवातीला उघडीप घेतल्यामुळे जिल्ह्यात भात कापणीला वेग आला आहे. तोपर्यंत सुमारे ४० टक्क्यांहून अधिक कापण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये जंगलातील रानडुकरे, गवे हे वन्यप्राणी भातशेतामध्ये शिरून धुडगूस घालत आहेत.
कळपाने येणारे हे प्राणी पीक आडवे करून टाकतात. शेतकऱ्यांना भात रोपांची कापणी करून ते झोडणेही शक्य होत नाही. राजवाडी येथील संतोष भडवळकर यांच्या शेतामध्ये दोन दिवसांपूर्वी रानडुकरांनी अक्षरशः धुडगुस घातला. वर्षभरासाठी लागणारा तांदूळ याच शेतामधून मिळत असल्याने शेतकऱ्याची पंचाईत झाली.
यंदा अनियमित पावसामुळे आधीच भात पीक कमी आले. त्यामध्ये वन्यप्राण्यांच्या त्रासामुळेही शेतकरी त्रस्त झाला. उर्वरित भात पिकांची कापणी होईपर्यंत भडवळकर यांनी रात्रीची गस्त सुरू केली आहे.
भात कापणी आणि रात्री रखवाली असे चोवीस तास राबावे लागत आहे. हीच परिस्थिती मंडणगड, राजापूर, लांजा, रत्नागिरीतही आहे. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी शेती सोडू लागले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.