Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : डहाणूत ३० हेक्टर भातपिकाचे नुकसान

Heavy Rain Crop Loss : गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले. डहाणू तालुक्यातदेखील पावसाने धुमाकूळ घातला असून दररोज संध्याकाळी व रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Kasa News : गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपले. डहाणू तालुक्यातदेखील पावसाने धुमाकूळ घातला असून दररोज संध्याकाळी व रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे.

यामुळे तयार झालेल्या भाताचे मोठे नुकसान होत आहे. तालुक्यात सुमारे ३० हेक्टरचे नुकसान झाले आहे. डहाणू तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांचे भात पीक कापणीला तयार झाले आहे. काही दिवसांत कापणीला सुरुवातदेखील होणार होती. तर काहींनी सुरुवात देखील केली होती.

हवामान खात्याने अजून काही दिवस पाऊस पडल्याचे वर्तवले असल्याने शेतकरी चिंताग्रत झाले आहेत. होता-तोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला जाणार, याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.

तालुक्यात पावसामुळे ९९ शेतकरी नुकसानग्रस्त झाल्याचे पाहणी अहवालात सांगितले. २९.८० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. कृषी विभागातर्फे पाहणी केली जात आहे.

दोन-चार दिवसांपासून पाऊस पडत असल्याने तयार झालेले भात पीक नुकसानग्रस्त झाले. दोन दिवसांपूर्वी कापलेले भात पावसाने भिजले आहे.
- भरत ठाकूर, शेतकरी
डहाणूत जवळपास ३० हेक्‍टरच्या आसपास भात शेती नुकसानग्रस्त असल्याची समजते. यात तालुक्यात ९९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
- एस. पाचपुते, कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pest Outbreak: हवामान बदलामुळे वाढला विषारी सुरवंटांचा प्रादुर्भाव

Indigenous Cattle Breeding: शाश्‍वत शेतीसाठी देशी गोवंश संवर्धन

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

SCROLL FOR NEXT