Fruit Market Rate agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Market Rate : पाडव्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा फुलल्या, फुलांसह फळांची वाढली मागणी

Padava Festival Market : उद्या मंगळवारी (ता. ९) गुढी पाडव्यामुळे नारळ, फुले, मेसकाठ्यांना अधिक मागणी असल्याने बाजारपेठा जोरदार फुलल्या आहेत.

sandeep Shirguppe

Kolhapur Fruit Market Rate : मागच्या काही महिन्यापासून गवारी दरात चांगलीच वाढ झाल्याचे पहायला मिळत होते परंतु कर्नाटकातून गवारीची कोल्हापूर जिल्ह्यात आवक वाढल्याने गवारीचे दर कमी होताना दिसत आहेत. वाढलेल्या आवकेने गवारीच्या दरात थेट पन्नास टक्क्यांनी दर उतरले आहेत तर शेतकऱ्यांना हिरव्या मिरचीच्या दरातून चांगला पैसा मिळत आहे.

पालेभाज्यांचेही वाढलेले दर कायम आहेत. याचबरोबर उद्या मंगळवारी (ता. ९) गुढी पाडव्यामुळे नारळ, फुले, मेसकाठ्यांना अधिक मागणी असल्याने बाजारपेठा जोरदार फुलल्या आहेत. फळ बाजारात आंब्याची आवक वाढली असून, द्राक्ष्यांची आवक सध्या कमी झाली आहे.

जनावरे बाजारात बकऱ्यांचे दर तेजीत होते. मंगळवारी होणाऱ्या पाडव्यामुळे पुजेच्या साहित्य खरेदीसाठी आठवडा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे. साखरेच्या माळा, नारळ, फुले, गुढीची साडी खरेदीसाठी लगबग वाढली आहे.

बाजारात रेडीमेड मिनी गुढी विक्रीसाठी असून, १५० ते ३०० रुपयापर्यंत दर आहेत. मेसकाठीचा दर १०० ते २०० रुपयांपर्यंत आकारानुसार आहे. नारळ १८ ते २५ रुपयांपर्यंत तर साखरेच्या माळा २० ते ४० रुपयांपर्यंत मिळत आहेत. गुढीला तयार साडीलाही महिलांची पसंती वाढल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक पैठणी, भरजरी साड्यांनाही मागणी प्रामुख्याने आहे.

उन्हाळी शेंगा दाखल झाल्या असून, ८० ते १०० रुपये किलो होत्या. भाजी मंडईत पालेभाज्या, कोंथिंबीर तुरळक झाल्या असून, १५ रुपये पेंढी असा दर होता. चार महिने दराची सेंच्युरी मारणाऱ्या गवारीचा दर कर्नाटकातील आवक सुरू झाल्याने निम्म्यावर आला. घाऊक दहा किलोला ४५० तर किरकोळ ६० रुपये किलो अशी विक्री होती.

वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण आहेत. याचा परिणाम आठवडा बाजारावरही झाला आहे. दुपारच्या सत्रात ग्राहक बाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळेच दुपारी १२ ते ४ या कालावधीत आठवडा बाजार ओस पडला होता. सायंकाळी पाचनंतरच बाजार भरल्याचे दिसत आहेत.

फळबाजारात सांगली जिल्ह्यातून होणाऱ्या द्राक्षांची आवक हंगाम संपत आल्याने कमी होत आहे. तुलनेत कोकणातील आंब्यांना चांगली मागणी वाढली आहे. डझनाचा ६०० ते ५०० रुपये दर आहे. जनावरांच्या बाजारात बकरीचे दर तेजीत असून, दहा ते पंधरा हजारांपर्यंत दर होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

Farm Equipment: मुरुडमध्ये अल्पभूधारकांना कृषी अवजारांचे वाटप

Ahilyanagar Agro Tourism : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाची निर्मिती करा

Research Paper Award: श्रीशैल्य हेगान्ना यांना रिसर्च अवॉर्ड

SCROLL FOR NEXT