Kolhapur Fruit Market : टोमॅटो, कांद्याला कवडीमोल भाव तर झेंडू, शेवंतीच्या फुलांचे दर वाढले, असा आहे बाजारभाव

Kolhapur Market : कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाला बाजारात पालेभाज्यांचे भाव कमी होताना दिसत आहे. या आठवड्यात आवक सुधारली आहे.
Kolhapur Fruit Market
Kolhapur Fruit Marketagrowon
Published on
Updated on

Kolhapur Bajar samiti : उन्हाळा सुरू झाल्याने काही ठिकाणी बाजारातील स्थिती बदलत चालली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजीपाला बाजारात पालेभाज्यांचे भाव कमी होताना दिसत आहे. या आठवड्यात आवक सुधारली आहे. कांदापात, मेथीचे भाव अन्य भाज्यांच्या बरोबरीत आले आहेत. शेवग्याची आवक चांगली आहे. दहा रुपयाला चार ते पाच शेंगा विक्रीस आहेत.

देशी काकडीची आवक जोमात होत आहे. फळबाजारात हंगामी फळांची मागणी वाढताना दिसत आहे. हापूस आंब्याला सध्या मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. बेबी हापूस दाखल झाला असून, याची किलोवर विक्री केली जाते. कलिंगड, टरबूजची मागणी अधिक आहे. फूल बाजारात झेंडू, शेवंतीच्या फुलांचे दर काहीसे वाढले आहेत.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला

टोमॅटो १० ते १५, दोडका- ५० ते ६०, वांगी ३० ते ५०, कारली ४० ते ५०, ढोबळी मिरची ६० ते ८०, मिरची ८० ते ९०, फ्लॉवर- ३० ते ४०, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा २० ते २५, लसूण- १२० ते १५०, आले- १०० ते १२०, लिंबू ३०० ते ६०० शेकडा, गाजर ३० ते ४०, बीन्स ७० ते ८०, गवार -८० ते १००, वरणा शेंगा ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा -७० ते ८०, पालेभाज्या पेंढी १२ ते १५, शेवगा - ३ रुपये.

फुले : झेंडू १०० ते १२०, निशिगंध -३००, गुलाब - १८० ते २००, गलांडा - १२० ते १५०, शेवंती -२००.

फळे : सफरचंद २५० ते ४००, संत्री १२० ते १३०, मोसंबी ५० ते ८०, डाळिंब - १२० ते २००, चिकू - ६० ते ८०, पेरू-५० ते ८०, खजूर-१५० ते २००, पपई - ४० ते ५०, मोर आवळा -१०० ते १२०, सीताफळ ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी १४० ते १५०, चिंच- १०० ते १४०, अननस - ४० ते ५०, अंजीर -८०-१००. खाद्यतेल : सरकी - ११५ ते १२०.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू ३२ ते ५५, गहू ३२ ते ४०, हरभरडाळ - ७३ ते ७६, तूरडाळ- १४५ ते १५५, मूगडाळ ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ- १२२ ते १३०, हरभरा- ७०, मूग- १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर - ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी - ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोले -१४० ते १६०.

लिंबूची आवक; दर घसरले

उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात झाल्यानंतर लिंबूचे दर भडकले होते. आता उन्हाच्या झळा तीव्र होत असताना लिंबूने दिलासा मिळाला आहे. शेकडा ८०० च्या घरात गेलेले दर आवाक्यात आले आहेत. बाजारात आवक जास्त असल्याने दर कमी होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com