Anil Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Padalse Irrigation Project : पाडळसे प्रकल्प लवकरच पूर्ण होईलच

Anil Patil : आपल्या पुढच्या पन्नास पिढ्यांचा विचार करायचा असेल तर पाच ते सहा वर्षे संयम ठेवा. तालुक्याचा विकास आणि तापी प्रकल्प पूर्ण झाल्यावरच मी मोकळा श्‍वास घेईल, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी येथे केले.

Team Agrowon

Jalgaon News : आपल्या पुढच्या पन्नास पिढ्यांचा विचार करायचा असेल तर पाच ते सहा वर्षे संयम ठेवा. तालुक्याचा विकास आणि तापी प्रकल्प पूर्ण झाल्यावरच मी मोकळा श्‍वास घेईल, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी येथे केले.

पाडळसरे धरणाला त्यांनी तालुक्यातील जनतेसह आज भेट देत सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली व अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. त्या वेळी ते बोलत होते. ठेकेदार व धरणाचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, महेंद्र बोरसे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, श्याम अहिरे,

भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, पाडळसरे जन आंदोलन समितीचे सुभाष चौधरी, पाडळसरे सरपंच शुभांगी पाटील, प्रा. सुरेश पाटील यांच्यासह तालुक्यातील हजारो जनता आदी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, की पाडळसरे धरणाला सुधारित प्रशासकीय मान्यता आणल्याने धरणाच्या कामाला गती मिळाली आहे.

या पंचवार्षिक काळात सलग पाच वर्ष धरणाचे काम सुरू आहे. प्रकल्पाचे काम करताना त्याच्या सर्व तांत्रिक बाबी पाहूनच काम करावे लागते. धरणाची किंमत वाढल्याने सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविणे महत्त्वाचे होते, असेही म्हणाले.

लवकरच ‘सीडब्ल्यूसी’ची मान्यता

सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर त्याच्या तिसऱ्या दिवसापासून तापी महामंडळाचे अधिकारी रात्र दिवस काम करीत आहे. आता त्याला लवकरच ‘सीडब्ल्यूसी’ची मान्यता घेतली जाईल. तालुक्याच्या जनतेला धरणावर आँखो देखी पाहण्यासाठी आणले आहे. येत्या काळात तुम्हीच काम पाहणार आहोत.

सुप्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मला मोठी मदत केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी खानदेशातील सर्वांत मोठ्या प्रकल्पाला मोठी मदत केली आहे. यासाठी जनतेने सद्यःस्थितीत महायुती सरकार शेतकरी हिताला प्राधान्य देत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT