Kholsapada Dam : खोळसापाडा धरणाचे काम रखडले

Kholsapada Dam Work : वसई-विरार महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सूर्याच्या पाण्याचे श्रेय घेण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दुसऱ्या बाजूला खोळसापाडा १ चे काम वन विभागाच्या जागेअभावी रखडले आहे.
Kholsapada Dam
Kholsapada Dam Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : वसई-विरार महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सूर्याच्या पाण्याचे श्रेय घेण्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. दुसऱ्या बाजूला खोळसापाडा १ चे काम वन विभागाच्या जागेअभावी रखडले आहे.

खोळसापाडा १ धरणातून ४७ एमएलडी इतके पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वसई-विरारकरांना पाण्याचा आणखी एक स्रोत उपलब्ध होणार होता; मात्र वन विभागाने जागा हस्तांतरित न केल्याने या धरणाचे काम थांबले आहे. जूनमध्ये या धरणाच्या जागेची पाहणी केली होती.

त्या वेळी धरणाचे काम डिसेंबरमध्ये सुरू होण्याचे संकेत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे यांनी दिले होते, परंतु अजूनही या कामाला सुरुवात झालेली नाही; तर खोळसापाडा २ चे काम अंतिम टप्प्यात आल्याने हे धरण पूर्ण झाल्यावर वसई-विरारकरांना पाणी उपलब्ध होणार आहे.

Kholsapada Dam
Jayakwadi Dam : प्रतिक्षा संपली ! नाशिकमधून जायकवाडी धरणात सोडलं पाणी

वसई-विरारच्या पाण्याची टंचाई लक्षात घेत वसई-विरार महापालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव करून खोळसपाडा धरणाला मान्यता दिली होती. यासाठी २७७ कोटींचा खर्च येणार होता. यापैकी ४२.२४७ कोटी रुपये वनजमिनींबाबत पाटबंधारे विभागाने खर्च केले आहेत. हे काम जलसंपदा विभागाच्या स्वनिधीतून करण्यात येणार आहे. धरणाला वन विभागाची अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे; मात्र वनजमीन हस्तांतरण बाकी आहे.

Kholsapada Dam
Koyna Dam : मुख्यमंत्र्याच्या सूचनेनुसार कोयना धरणातून विसर्ग सुरू

८० टक्के काम पूर्ण

धरणाच्या कामाला नोव्हेंबर २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. आमदार क्षितिज ठाकूर आणि आमदार राजेश पाटील यांनी भूमिपूजन केले होते. हे धरण लघुपाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात येत आहे. धरण वसई-विरार शहरापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर उसगाव परिसरात आहे. धरणाचा एकूण खर्च ७७ कोटी रुपये आहे. हा सर्व खर्च पालिकेतर्फे करण्यात येत आहे. या योजनेच्या कामासाठी एकूण ३०.८७ हेक्टर वनजमीन संपादित करण्यासाठी जमिनीचे मूल्य व वर्तमान मूल्य असा एकूण ११.९६ कोटी इतका निधी वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून वन विभागाला देण्यात आला आहे. या धरणाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढणाऱ्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असल्याने पाणी पुरवण्यासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत. त्यातील खोळसापाडा ही एक योजना आहे. हे धरण पालिकेच्या मालकीचे असणार आहे. या धरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. धरण पूर्ण झाल्यावर पाणी उपलब्ध होणार आहे.
अनिलकुमार पवार , आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com