Padalse Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Padalse Irrigation Project : सुधारित मान्यतेनंतरही पाडळसे प्रकल्पाचे भिजत घोंगडे

Khandesh Irrigation Project : तापी नदीवरील अमळनेर (जि. जळगाव) नजीकच्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पास डिसेंबर २०२३ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : तापी नदीवरील अमळनेर (जि. जळगाव) नजीकच्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पास डिसेंबर २०२३ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पास गती मिळेल, असे चित्र होते. पण काम सुरू नसल्याचीच ओरड शेतकरी, ग्रामस्थांत आहे.

१४ वर्षे हा प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत होता. त्याचा खर्च सतत वाढला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, धरणगाव व धुळ्यातील शिरपूर व शिंदखेडा तालुक्यास या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. शेतीसह उद्योगासंबंधी या भागास या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. २८ वर्षे हा प्रकल्प रेंगाळलेला आहे.

या काळात आता चौथ्यांदा या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. चार हजार ८९० कोटी ७७ लाख रुपये निधी खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिली होती. लवकरच प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. राज्य शासनाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिल्याने पंतप्रधान सिंचन योजनेत या प्रकल्पाच्या समावेशाचा मार्गही मोकळा झाला.

१९९५-९६ मध्ये प्रथमच या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळेस सुमारे १४२ कोटी रुपये निधीची घोषणा झाली होती. परंतु निधी न मिळाल्याने पुन्हा त्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. पुन्हा निधीची अडचण आली. यामुळे प्रकल्पाचा खर्च सतत वाढून पाच हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे.

एक लाख हेक्टर क्षेत्र भिजणार

पाडळसे निम्न तापी प्रकल्पामुळे जळगाव व धुळे जिल्ह्यातील सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. केळी, भाजीपाला, फळे व कापूस पिकाच्या शेतीला मोठा आधार या प्रकल्पामुळे होऊ शकतो, असा दावा प्रशासन, शासन करीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supreme Court verdict: २०१८ पूर्वीची बंद झालेली जमीन अधिग्रहण प्रकरणे पुन्हा उघडता येणार नाहीत; सर्वोच्च न्यायालय

Agrowon Podcast: कापूस दबावात; सोयाबीनमध्ये नरमाई, मका आवक चांगली, केळी भाव टिकून तर पपई खातेय भाव

Village Protest: वनविभागाच्या विरोधात नऊ मार्चपासून ठिय्या आंदोलन

Maharashtra Assembly Budget Session 2026: राज्यपालांचे अभिभाषण; विदर्भ विकास, समृद्धी महामार्ग विस्तार आणि कृषी एआयवर भर

Millet Festival: पौष्टिक तृणधान्य महोत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी पाटील

SCROLL FOR NEXT