सोयाबीन दर तेजीतराज्यातील सोयाबीन बाजारात दरातील चढ-उतार कायम आहेत. अमरावती बाजारात सोयाबीनची आवक ९ हजार २२० क्विंटलवरून ८ हजार १३३ क्विंटल झाली असून, सरासरी दर ६ हजार ८२५ रुपयांवरून ६ हजार ९२५ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला. लातूर बाजारात आवक ७ हजार ८८१ क्विंटलवरून ५ हजार ६१८ क्विंटल झाली, तर सरासरी दर ७ हजार १७० रुपयांवरून ७ हजार २२० रुपये झाला. तसेच, अकोला बाजारात आवक ५ हजार ३८८ क्विंटलवरून ३ हजार ८७७ क्विंटल झाली असून, सरासरी दर ६ हजार ८८० रुपयांवरून ७ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे..तुर दर कायमआज तूर बाजारात काही ठिकाणी दरात वाढ, तर काही ठिकाणी घसरण दिसून आली. अमरावती बाजारात तुरीचा सरासरी दर १० हजार २७५ रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला. तर, अकोला बाजारात सरासरी दर १० हजार १०० रुपयांवरून ९ हजार ९०० रुपयांवर आला. लातूर बाजारात तुरीचा सरासरी दर १० हजार २०० रुपयांवर स्थिर राहिला. अकोला बाजारात तुरीची आवक ५२२ क्विंटलवरून ३७१ क्विंटल झाली, तर लातूरमध्ये आवक २०४ क्विंटलवर कायम राहिली होती..India Soybean Price: सोयाबीनच्या तेजीमागे दुष्काळ की साठेबाजी ?.कांद्याच्या दरात वाढकांदा बाजारात सरासरी दरात वाढ झाल्याचे दिसून आले. कळवण बाजारात उन्हाळी कांद्याचा सरासरी दर ४ हजार रुपयांवर स्थिर राहिला, तर आवक ४ हजार ४०० क्विंटलवरून १० हजार ३५० क्विंटल झाली. तर, पिंपळगाव बसवंत बाजारात सरासरी दर ४ हजार १०० रुपयांवरून ४ हजार २५० रुपये प्रति क्विंटल झाला. येथे आवक ७ हजार २१४ क्विंटलवरून ८ हजार ८०० क्विंटल झाली. त्याचबरोबर देवळा बाजारात कांद्याचा सरासरी दर ३ हजार ८३० रुपयांवरून ३ हजार ९८० रुपये प्रति क्विंटल झाला असून, आवक ४ हजार १०६ क्विंटलवरून ५ हजार ७४० क्विंटल झाली..Agrowon Podcast: सोयाबीनचे दर तेजीतच! आल्याचे दर स्थिर, काकडीची आवक वाढली; हिरव्या मिरचीच्या दरात चढ-उतार तर पेरूच्या दरात घसरण.मेथीच्या दरात चढ-उतारराज्यातील मेथीच्या बाजारात आज वेगवेगळे भाव पाहायला मिळाले. पुणे बाजारात मेथीचा सरासरी दर १४ रुपये प्रति नगावर स्थिर होता. तर, पुणे-मोशी बाजारात सरासरी दर २५ रुपयांवरून २० रुपये प्रति नग पाहायला मिळाला. सोलापूर बाजारात मेथीचा सरासरी दर १ हजार २०० रुपयांवरून १ हजार ३०० रुपये झाला. त्याचबरोबर, सोलापूरमध्ये मेथीची आवक ६ हजार २२९ नगांवरून ६ हजार ३७३ नग झाली, तर पुणे बाजारात आवक ४१ हजार ९२५ नगांवरून ६७ हजार ३२५ नगांपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले..केळीचे दर स्थिरकेळीच्या बाजारात बहुतांश ठिकाणी सरासरी दर स्थिर राहिल्याचे चित्र होते. आज यावल बाजारात केळीचा सरासरी दर १ हजार ३१० रुपये प्रति क्विंटलवर कायम राहिला, तर आवक १ हजार ६५० क्विंटलवरून १ हजार ७१० क्विंटल झाली होती. तर, पुणे-मोशी बाजारात केळीचा सरासरी दर ५ हजार रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिला. तसेच, नाशिक बाजारातही सरासरी दर १ हजार रुपये प्रति क्विंटलवर कायम राहिला. मात्र, नाशिकमध्ये केळीची आवक १३० क्विंटलवरून ६० क्विंटल झाली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.