Padalse Project Agrowon
ॲग्रो विशेष

Padalse Project : पाडळसे सिंचन प्रकल्प लवकरच पूर्ण होणार

Irrigation Project : जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील अमळनेरातील पाडळसरे धरणाचे काम २०२५ पर्यंत पुर्णत्वास आणण्याचा महायुती सरकारचा मानस आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील अमळनेरातील पाडळसरे धरणाचे काम २०२५ पर्यंत पुर्णत्वास आणण्याचा महायुती सरकारचा मानस आहे. या प्रकल्पाला कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार व अन्य नेत्यांनी नुकतीच दिली आहे.

पाडळसे प्रकल्पाची नुकतीच मंत्री पवार व अन्य अधिकारी, मंत्र्यांनी पाहणी केली. आगामी लोकसभा निवडणुकीत आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा कशा निवडून येतील यासाठी साथ द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी यानिमित्त केले.

साहित्य संमेलनासाठी अजित पवार अमळनेर येथे आले होते. सकाळी आठला अमळनेरात आल्यावर त्यांनी वेळ काढत पाडळसरे धरणावर जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. प्रकल्पाची पूर्ण माहिती जाणून काही सूचना केल्या.श्री. पवार पुढे म्हणाले, ‘‘आम्ही सरकारमध्ये सामील झालो नसतो तर पाडळसरे धरणाला विलंब झाला असता. जळगाव व धुळे जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता यावी, ५ सरकारी उपसा सिंचन योजना व २ सहकारी उपसा योजना सरकारच्या ताब्यात घेऊन त्या सुरू करण्यासाठी केंद्राची मदत लागेल.’’

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांत नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे सरकार आहे. त्यामुळे तापीच्या पाणी वाटपाचा प्रश्न अभ्यास करून व चर्चा करून सोडवला जाईल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

पाडळसे निम्न तापी प्रकल्पास सुधारित मान्यताअनिल पाटील म्हणाले, ‘‘निम्न तापी पाडळसे प्रकल्प हा जळगाव धुळे जिल्ह्यातील गावांसाठी कायापालट करणारा ठरणार आहे. सुप्रमा मिळाल्याने आणि निधी मिळणार असल्याने आजूबाजूच्या गावात शेतकऱ्यांच्या घरात जी भाकरी खाल्ली जाईल त्यावर अजित पवारांचे नाव असेल.

एसएफसी मान्यता मिळाली आहे, केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. २०२५ पर्यंत धरणाचे काम पूर्ण होईल. लवकरच उपसा सिंचन योजनेचे टेंडर काढले जाईल,’’ असेही त्यांनी यावेळी माहिती देताना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT