MLA Kishor Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Pachora APMC : पाचोरा बाजार समितीची एक इंचही जागा विकू देणार नाही

MLA Kishor Patil : बाजार समितीची एक इंचही जागा विकू देणार नाही, अशी ग्वाही देत उपस्थित शेतकऱ्यांकडून हात उंचावून त्याचा आमदार किशोर पाटील यांनी दुजोरा मिळवून घेतला.

Team Agrowon

Jalgaon News : शेतकऱ्यांच्या हिताची व तालुक्याचे वैभव असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा ज्यांच्या काळात अत्यल्प किंमत ठरवून विक्री व्यवहार करण्यात आला, तेच उपरे आता आव आणून आमचा जागेशी काही संबंध नाही, असा देखावा करून दिशाभूल करीत आहेत.

नागपूर विधानसभा अधिवेशनातही याबाबत आवाज उठवून तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी केली. आताही शपथ घेऊन सांगतो बाजार समितीची एक इंचही जागा विकू देणार नाही, अशी ग्वाही देत उपस्थित शेतकऱ्यांकडून हात उंचावून त्याचा आमदार किशोर पाटील यांनी दुजोरा मिळवून घेतला.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बाजार समितीच्या आवारात शेतकरी कृषी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. आमदार किशोर पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘आत्मा’चे माजी प्रकल्प संचालक अनिल भोकरे, अश्वमेध संस्थेचे किशोर मोरे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे व (स्व.) आर. ओ. तात्या पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलनाने परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, रवींद्र पाटील, महेश कासार, बी. बी. बोरुडे, संचालक प्रकाश तांबे, पूनम पाटील,

मनोज सिसोदिया, युसूफ पटेल, सुनील पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, श्‍यामकांत पाटील, पंढरीनाथ पाटील, संजय पाटील (भुरा आप्पा), डॉ. विशाल पाटील, पदमसिंग पाटील, युवराज पाटील, विकास पाटील, रमेश जाधव, हर्षल पाटील, प्रतीक ब्राम्हणे, आनंदा पाटील, शशिकांत येवले, अनिल पाटील, राजेंद्र पाटील भडगाव, देविदास पाटील, रवी केसवानी, शरद पाटे, आदी उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार किशोर पाटील यांच्या विकास दिनदर्शिकेचे उपस्थितांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी अनिल भोकरे यांनी ‘कृषी उद्योजक काळाची गरज’ या विषयावर तर कैलास मोरे यांनी ‘कृषी क्षेत्रातील तांत्रिक विभागाच्या योजना’ यावर उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी तालुकाप्रमुख सुनील पाटील, रावसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

Rabi Sowing : जालन्यात रब्बीची निम्मी पेरणी

Agriculture Method : पाणी, मातीची उत्पादकता वाढविणारी ‘पाच स्तरीय शेती’

Rabi Crop Management : रब्बी पिकांत संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्त्वाचे

Sericulture Farming : रेशीम शेतीने दिला युवकांना रोजगार

Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीत कांदा, टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दरातही चढ उतार

SCROLL FOR NEXT