Paddy Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : तीन हजार भात उत्पादकांनी नोंदविल्या नुकसानीच्या सूचना

Paddy Crop Damage : सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या तीन हजार भातपीक उत्पादकांनी पीकविमा कंपनीकडे सूचना नोंदविल्या आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या तीन हजार भातपीक उत्पादकांनी पीकविमा कंपनीकडे सूचना नोंदविल्या आहेत. या नुकसानीचे कृषी विभाग, पीकविमा प्रतिनिधीकडून पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस पडत आहे. काही भागांत पूरसदृशस्थिती निर्माण होऊन नदीलगतच्या भातपिकांमध्ये दगडमातीचा गाळ साचला होता. त्यानंतर आतापर्यंत सतत पाऊस पडत आहे.

या पावसामुळे जिल्ह्यातील भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महिनाभरापूर्वी परिपक्व झालेल्या भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात १० ते १२ हजार हेक्टर भातपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यातील ३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे नुकसानीच्या सूचना नोंदविल्या आहेत. सूचना नोंदविल्यानंतर पीकविमा प्रतिनिधी आणि कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. दरम्यान, नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत विमा कंपनीकडे तीन हजार शेतकऱ्यांनी सूचना नोंदविल्या आहेत. ज्यांनी सूचना नोंदविल्या त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
- अरुण नातू, तांत्रिक अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी कार्यालय, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT