Paddy Crop Damage : काढणीस आलेल्या भात पिकांचे पावसाने नुकसान

Heavy Rain Crop Loss : जुन्नर तालुक्यातील मढ व कोपरे खोऱ्यातील काढणीस आलेल्या भात पिकाला मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे.
Paddy Crops
Paddy CropsAgrowon
Published on
Updated on

Pune News : जुन्नर तालुक्यातील मढ व कोपरे खोऱ्यातील काढणीस आलेल्या भात पिकाला मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसला आहे. तरी शासनाने परतीच्या पावसाने भात पिकाच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी देवराम डावखर, संदीप घोडे, डॉ. किसन कोकाटे यांनी सर्व शेतकऱ्यांतर्फे केली आहे.

Paddy Crops
Paddy Crop Damage : मुळशी तालुक्यात पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान

तालुक्यातील मढ व माळशेज खोऱ्यातील तळेरान, खुबी, करंजाळे, सांगनोरे, खिरेश्वर, कोल्हेवाडी, तळेचीवाडी, अजनावळे, देवळे, रानचरी, खैरे, खटकाळे तसेच कोपरे, मांडवे, मुथाळणे, जांभुळशी या परिसरातील ही भात उत्पादक शेतकऱ्याचा कापणीस आलेल्या भात पिकाला परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून भात पीक खराब होऊ लागले आहे.

Paddy Crops
Paddy Crop Damage : भातपीक तरंगले पाण्यावर

आदिवासी भागातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक गणित भात पिकावर अवलंबून असते. त्यात आता एकीकडे भात कापणी सुरू असतानाच पावसाने पिके खराब केली असल्याने आता वर्षभर कसे जगायचे व काय खायचे? असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांना पडला आहे.

एवढे काबाडकष्ट करून केलेली भात शेती उत्पादन हातात येताना वाया जायची भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी भात रोपे तयार करून त्याची लावणीपासूनची मशागत, भात कापणी करून ते झोडपून घरी आणण्यासाठी झालेले कष्ट, त्यावरील खर्च, मजुरी हे सर्व वाया जाणार आहे. पाऊस जर थांबला नाही तर भाताचा पेंढा ही वाया जाणार आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ही उपस्थित होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com