Devendra Fadanvis Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadanvis : दुष्काळाचा इतिहास पुसून काढण्याचे आमचे स्वप्न

Response to Drought : सांगली, सातारा, सोलापूर या दुष्काळी भागात विविध सिंचन प्रकल्पांना हजारो कोटी रुपये दिले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देऊन या तिन्ही जिल्ह्यांतील दुष्काळाचा इतिहास पुसून काढण्याचे आमचे स्वप्न आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली, सातारा, सोलापूर या दुष्काळी भागात विविध सिंचन प्रकल्पांना हजारो कोटी रुपये दिले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देऊन या तिन्ही जिल्ह्यांतील दुष्काळाचा इतिहास पुसून काढण्याचे आमचे स्वप्न आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच सभेला उपस्थित गर्दी पाहून संजय पाटील यांची हॅटट्रिक पक्की आहे. याबाबत माझ्या मनात शंका नाही, असेही ते म्हणाले.

सांगली येथे शुक्रवारी (ता. १८) भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्या यांच्या प्रचाराच्या प्रारंभप्रसंगी फडणवीस बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे उमेदवार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, जनसुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे, दिनकर पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत, सुहास बाबर, पृथ्वीराज देशमुख यादी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की सगळे पक्ष मिळून एक मोठी आघाडी केली आहे. आपली विकासाची गाडी आहे. विकासाच्या गाडीला नरेंद्र मोदींचे इंजिन आहे. प्रत्येक पक्षाचा डबा त्याला आहे आणि या डब्यांमध्ये सामान्य माणसाला बसायची जागा आहे. मात्र समोरच्या राहुल गांधींच्या आघाडीला फक्त इंजिनच आहे. त्यांच्या आघाडीला प्रत्येक जण मीच इंजिन आहे, असे म्हणतो आणि तिथे त्यांच्या परिवारालाच बसण्यासाठी जागा आहे, जनतेसाठी नाही. संजयकाका मोदीजींच्या इंजिनसोबत सांगलीकरांना डब्यामध्ये बसवून विकासाकडे चालले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की ही निवडणूक गावठी भावकीची नसून देशाचा नेता निवडण्याची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अजिबात गाफील राहू नका. नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षांत देशाचा गौरव वाढवला. वसंतदादांनी कारखाना चांगला चालवला. आम्ही कौतुक करायचो. कारखान्याचे वाटोळे कोणी केले? यांना कारखाना चालवता येत नाही आणि निघालेत खासदार व्हायला, अशी टीका त्यांनी केली.

संजय पाटील म्हणाले, की दहा वर्षे लोकसभेत मला जनतेने काम करण्याची संधी दिली. मी मोदींचा सैनिक त्यांच्या परिवाराचा सदस्य आहे. महायुतीचा घटक म्हणून काम करतो. सिंचन योजनेसाठी निधी आणला. विस्तारित ‘टेंभू’, ‘म्हैसाळ’ची कामे मार्गी लागली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT