Sangli DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli DCC Bank : थकबाकीदार शेतकरी, संस्थांसाठी ‘ओटीएस’ योजना

OTS Scheme : नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांनी अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना सांगली जिल्हा बॅँक सलग तिसऱ्या वर्षी ओटीएस योजनेच्या माध्यमातून दिलासा देणार आहे.

Team Agrowon

Sangli News : नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांनी अडचणीत सापडलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना सांगली जिल्हा बॅँक सलग तिसऱ्या वर्षी ओटीएस योजनेच्या माध्यमातून दिलासा देणार आहे.

बॅँक लवकरच सर्वसमावेश अशी थकबाकीदार शेतकरी व संस्थांसाठी ओटीएस योजना आणणार आहे. अशी वेगळी योजना राबवणारी सांगली जिल्हा बॅँक राज्यातील पहिली बॅँक असल्याची माहिती बॅँक अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी दिली.

नाईक म्हणाले, की जिल्हा बँकेने गेल्या काही वर्षांत प्रचंड वेगाने प्रगती केली आहे. बॅँकेने रिझर्व्ह बॅँकेचे सर्व निकष पूर्ण केले असून बॅँक आर्थिकदृष्टया भक्कम स्थितीत आहे. बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेली दोन वर्षे योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. यंदाही ही योजना सुरू करणार आहे.

गेल्या योजनेत थोडी सुधारणा करून लवकरच नवीन योजना आणली जाईल. बँकेच्या नफ्यातून थकबाकीदार शेतकरी, संस्थांना ओटीएस देणारी जिल्हा बॅँक राज्यात पहिली आहे. बॅँकेने मार्च २०२५ चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कर्जवसुली, व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. २२५ कोटी नफ्याचे उदिष्ट आहे.

ठेवींमध्ये एक हजार कोटींची वाढ करून ९ हजार कोटीं, कर्जपुरवठा आठशे कोटींनी वाढवून साडेसात हजार कोटींवर नेण्याचे उदिष्ट आहे. एकूण व्यवसाय १५ हजार कोटींवर नेण्यात येणार आहे.

सांगली जिल्हा बॅँकेचा मार्चअखेर नेट एनपीए शून्य टक्के करण्याचा तसेच ग्रॉस एनपीए ५ टक्क्यांच्या आत असेल. वास्तविक बॅँकेचा आताच नेट एनपीए शून्य टक्के जवळपास झाला आहे. साखर कारखान्यांचा कर्जपुरवठा चारशे कोटींनी वाढवून तो एक हजार कोटींवर केला जाईल.

अनिष्ठ तफावतील सोसायट्यांचे प्रमाण घटले

शेतकरी, संस्थांना जिल्हा बॅँकेने ओटीएस योजना लागू केल्याने थकबाकीदारांसाठी विकास सोसायट्यांनाही दिलासा मिळाला आहे. २०२२ मध्ये थकित सोसायट्यांची संख्या १४६ व एनपीए ११३ कोटींचा होता. आता ही संख्या १०२ वर आली असून एनपीए ८२ कोटींवर आहे. मार्चअखेर यात आणखीन घट होईल. बॅँकेने एनपीए वाढणाऱ्या कर्जयोजना बंद केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri College Land Issue: कृषी महाविद्यालयातील आठ एकर जमीन नापीक

Hingoli Turmeric Market: हिंगोली बाजार समितीत हळदीची ३ लाख १९ हजार क्विंटल आवक

Fuel and Fertilizer Prices: इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार

Cotton Procurement Policy: कापूस खरेदीऐवजी भावांतर राबविणार

Maharashtra Heat Update: राज्यात उष्णतेची लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT