Sangli DCC Bank : जिल्हा बॅंक कर्मचाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ

DCC Bank Employee : जिल्हा बॅंकेच्या एक हजार १९४ कर्मचाऱ्यांना सुमारे १० टक्के पगारवाढीबाबत कर्मचारी संघटनेबाबत शुक्रवार (ता. ७) करार झाला.
Sangli DCC Bank
Sangli DCC BankAgrowon

Sangli News : जिल्हा बॅंकेच्या एक हजार १९४ कर्मचाऱ्यांना सुमारे १० टक्के पगारवाढीबाबत कर्मचारी संघटनेबाबत शुक्रवार (ता. ७) करार झाला. मार्च २०२३ पासून पगारवाढ लागू होईल. यामुळे बॅंकेवर वर्षाला ४.५ कोटी, तर त्यांच्या विमा हप्त्यासाठी १ कोटी असा ५.५ कोटी रुपये बोजा पडणार आहे.

अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील, ‘सीईओ’ शिवाजीराव वाघ, जिल्हा बॅंक कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष आनंदराव आडसूळ, सचिव प्रदीप पाटील, डी. के. पाटील, नरेंद्र सावंत, विजय लिगाडे यांच्या उपस्थितीत करार झाला.

Sangli DCC Bank
Sangli DCC Bank : शेतकरी ‘ओटीएस’ योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ शक्य

अजितराव घोरपडे, राजेंद्र डांगे, मन्सुर खतीब, वैभव शिंदे, संग्रामसिंह देशमुख, सरदार पाटील संचालक उपस्थित होते. जिल्हा बॅंक, कर्मचारी संघटनेत पगारवाढीबाबत सहा महिने चर्चा सुरू होती. लोकसभा आचारसंहिता संपल्यानंतर आज करार झाला. अध्यक्ष नाईक म्हणाले, ‘‘बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना वार्षिक ४.५ कोटी, तर कर्मचारी विम्यासाठी १ कोटी रुपये या करारानुसार मिळणार आहेत.

कर्मचाऱ्यांना किमान ११०० रुपये, कमाल आठ हजार ५०० रुपये पगारवाढ मिळेल. कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्यास ५० हजार मदत व सहा महिने रजा याशिवाय कर्मचाऱ्यांना दुर्धर आजार उपचारासाठी ५० हजार व सहा महिने रजा मिळेल. कराराची अंमलबजावणी मार्च २०२३ पासून होईल.

Sangli DCC Bank
Sangli DCC Bank : पावणेतीन लाख कर्जदार शेतकऱ्यांचा सांगली जिल्हा बँकेने विमा उतरवला

कर्मचाऱ्यांना मागील १४ महिन्यांचा फरक मिळेल. यापूर्वीच्या करारावेळी ३.४५ कोटी तरतूद होती. कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी एक पद गॅप टाकून मिळेल. त्यासाठी आयबीपीएस मार्फत परीक्षा होईल. त्यात ६० गुण मिळाले तर थेट पदोन्नती मिळेल. कारकुनांना एक टप्पा गॅप देऊन पदोन्नती होईल.

जिल्हा बॅंकेच्या प्रगतीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भरीव योगदान आहे. गेल्या आर्थिक वर्षात बॅंकेला २०४ कोटी रुपये नफा झाला. एनपीए कमी, कर्जवसुली सर्वच पातळ्यांवर आघाडीवर आहे. सध्याच्या पगारवाढीने कर्मचारी जोमाने काम करतील.
- आमदार मानसिंगराव नाईक, अध्यक्ष, जिल्हा बॅंक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com