PDKV Akola Agrowon
ॲग्रो विशेष

Joint Agresco 2024 : अकोल्यात आजपासून ‘जॉइंट अॅग्रोस्को’चे आयोजन

PDKV Akola : ‘‘राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ‘संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती’ची ५२ वी बैठक आज (ता. ७) ते रविवार (ता. ९) दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होत आहे.

 गोपाल हागे

Akola News : ‘‘राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ‘संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती’ची ५२ वी बैठक आज (ता. ७) ते रविवार (ता. ९) दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात होत आहे. या ‘जॉइंट ॲग्रेस्को’मध्ये चारही विद्यापीठे मिळून ३०२ शिफारशी सादर करतील,’’ अशी माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी गुरुवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत दिली.

संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, अधिष्ठाता डॉ. श्‍यामसुंदर माने व इतर विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. डॉ. गडाख म्हणाले, ‘‘यावेळच्या बैठकीत आजवरच्या उच्चांकी अशा ८६ शिफारशी पंदेकृवि तर ११५ शिफारशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ सादर करीत आहे.

प्रसारणासाठी २१ पीकवाण, १२ अवजारे व यंत्रे आणि २६९ उत्पादन तंत्रज्ञान शिफारशी मांडल्या जातील. यावर चर्चा होऊन पात्र ठरलेल्यांना मंजुरी देण्यात येईल. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे देखील ५७ तर दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाद्वारे ४४ शिफारशींचे सादरीकरण होईल.’’

तीन दिवस तांत्रिक सत्रे

या बैठकीचे आज सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन होईल. बैठक एकूण तीन तांत्रिक सत्रांमध्ये होईल. त्याअंतर्गत कृषी शास्त्र विषयक विविध १२ गटांचा समावेश केला आहे. पहिल्या तांत्रिक सत्रामध्ये राज्यातील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संशोधन संस्थांचे संचालक त्यांचे सादरीकरण करतील. विद्यापीठांचे संशोधन संचालक देखील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनात्मक उपलब्धी मांडतील.

दुसऱ्या तांत्रिक सत्रात कृषी शास्त्रज्ञांद्वारे संशोधनात्मक निष्कर्षांचे संगणकीय सादरीकरण होईल. यामध्ये अनुक्रमे अन्नधान्य पिकांसाठी शेती पिके (पीक सुधारणा व धोरण), नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन, उद्यान विद्या, पशू विज्ञान व मत्स्यपालन, मूलभूत शास्त्रे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, पीक संरक्षण, कृषी अभियांत्रिकी, सामाजिक शास्त्रे, शेती पिके वाण प्रसारण समिती, उद्यानविद्या पिके वाण प्रसारण समिती, कृषी यंत्रे व अवजारे प्रसारण समिती, जैविक आणि अजैविक ताण सहन करणारे स्रोत नोंदणी प्रस्ताव व उपयुक्त सूक्ष्मजीव समिती आदी विषयांवरील महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश असेल. समारोपीय कार्यक्रमांमध्ये उपरोक्त १२ तांत्रिक गटनिहाय मंजूर केलेल्या शिफारशींचे वाचन होऊन अंतिम स्वरूप देण्यात येईल. या बैठकीसाठी सुमारे ३०० मान्यवर व शास्त्रज्ञ उपस्थित राहतील.

मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीची साशंकता

दरवर्षी या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी, फलोत्पादन खात्यांचे मंत्री उपस्थित राहतात. लोकसभेच्या निकालामुळे यापैकी किती जण उपस्थित राहतील, याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे ही बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच होण्याची चिन्हे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: संपूर्ण कर्जमाफी, ५० हजार एकरी मदतीसाठी शेतकरी आणि शेतमजूरांचे राज्यभर आंदोलन

Maharashtra Farmers Compensation: एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, आणखी काही तालुक्यांचा समावेश होईल - बावनकुळे

Farmer Protest: अतिवृष्टीच्या मदतीमध्ये नांदेड जिल्ह्याला भोपळा; शेतकरी-शेतमजुरांचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

Farmer Compensation : ई-केवायसी न करता मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर

Crop Damage : अचूक नुकसानीसाठी वाढीव पीक कापणी प्रयोग

SCROLL FOR NEXT