Pune News: राज्यात पुढील ४ दिवस पावसाला पोषक वातावरण असणार आहे. राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. .राज्यात आजपासूनच काही भागात पावसाचा अंदाज आहे. आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .Weekly Weather: तापमान वाढ, ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता.बुधवारी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी बुलडाणा आणि वाशीम जिल्हा वगळता राज्यभरात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदूर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे..तर विदर्भातील भंडारा, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात तसेच मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे..Maharashtra Weather: राज्यात वादळी पावसाचा इशारा.गुरुवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदीया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहिल्यानगर तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .शुक्रवारी नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.