Water Conservation Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Conservation Award : ‘मिशन ५००’चे पाच पाटील, शेखर निंबाळकर यांना ‘जल प्रहरी सन्मान’

Jal Shakti Mantralay : या वेळी भारताचे जल पुरुष आणि स्टॉकहोम पुरस्काराने सम्मानित असलेले राजेंद्र सिंग यांच्या हस्ते महाराष्ट्रातील श्री. निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले. या

Team Agrowon

Pune News : जल सुरक्षा, जल संरक्षण आणि जल संधारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रशासकीय यंत्रणा व सामाजिक संस्था यांना जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार व Sarkaritel.com च्या वतीने ‘जल प्रहरी सन्मान’ने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे बुधवारी (ता. १३) सन्मानित करण्यात आले.

या वेळी भारताचे जल पुरुष आणि स्टॉकहोम पुरस्काराने सम्मानित असलेले राजेंद्र सिंग यांच्या हस्ते महाराष्ट्रातील शेखर निंबाळकर यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला जल शक्ती मंत्रालय, भारत सरकारच्या स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभात भाई पटेल, केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, खासदार उन्मेष पाटील, खासदार गोपाल शेट्टी, निती आयोगचे सदस्य रमेश चंद्र, जलशक्ती मंत्रालयाचे सहसचिव आनंद मोहन यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

या वेळी वेगवेगळ्या विषयांवर ३ चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चा सत्रात श्री. निंबाळकर सहभागी झाले होते. मिशनच्या पाच पाटील टीमने लोक सहभाग आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने केलेल्या कामाची माहिती त्यांनी मांडली आणि मिशन सारखे उपक्रम भारताच्या इतर राज्यांत सुरू व्हावेत असे आव्हान केले.

त्यांच्या सोबत एनआरएमचे संचालक राजीव अहल, कोल्हापूरचे आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर, कानपूरच्या मुख्य विकास अधिकारी लक्ष्मी नागप्पान, सोमया पांडे, राजस्थान सरकारचे कार्यकारी अभियंता अरविंद सक्सेना, ग्रीन थंब पुणेचे कर्नल सुरेश पाटील हे चर्चासत्रात सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Argentina Agriculture : भारत आणि अर्जेंटिनामध्ये करार; तेलबिया, कडधान्यासाठी दोन्ही देश संयुक्त संशोधन करणार

Pradnya Satav Resigns: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश

Maize Procurement: कन्नड तालुक्यात ६६१ नोंदण्या झाल्या पूर्ण

Police Patil Bharati: बीड जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीमधील बिंदूनामावलीचा अडसर दूर

Vertical Farming : शहरी भागातील उभ्या शेतीला जपानच्या तंत्रज्ञानाची साथ?

SCROLL FOR NEXT