Crops Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Competition : खरीप हंगाम पीक स्पर्धेत भाग घ्यावा; कृषी विभागाचे आवाहन

Kharif Season : कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत खरीप पीक स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Team Agrowon

Solapur News : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्मिती व्हावी. तसेच शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देण्यासाठी खरीप हंगामातील पीक उत्पादनासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

‘खरीप हंगाम २०२३’मध्ये मूग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, नाचणी (रागी), भात, ज्वारी, ज्वारी, भुईमूग, सूर्यफूल या पिकांचा स्पर्धेमध्ये समावेश आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे संबंधित पिकाखालील किमान ४० आर. (०.४० हेक्टर) सलग क्षेत्रावर लागवड असावी. तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील व आदिवासी गटातील स्पर्धकांचा सहभाग आवश्यक आहे. भाग घेण्यासाठी ३०० रुपये प्रतिशेतकरी प्रति पीक याप्रमाणे प्रवेश शुल्क आकारले जाईल.

एक शेतकरी एकापेक्षा अधिक पिकासाठी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. ‘‘खरीप हंगामात उडीद व मूग पिकांसाठी स्पर्धेत अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै २०२३ आहे. उर्वरित पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२३ आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले.

राज्यपातळीवरचे बक्षीस ५० हजारांचे

तालुका पातळीवरील सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस दहा हजार रुपये, दुसरे बक्षीस सात हजार रुपये, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे बक्षीस ४० हजार रुपये आणि तिसरे बक्षीस ३० हजार रुपये आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT