Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Fertilizers : भात, गहू पिकांसाठी सेंद्रिय खताच्या पॅलेट

Agriculture Solution : मंगळवेढा येथील प्रयोगशील शेतकरी वैभव मोडक यांनी ‘सीड विथ कॉम्पॅक्ट ऑरगॅनिक फर्टिलायझर’ तंत्रज्ञानाचा वापर करत गहू लागवडीमध्ये सेंद्रिय खताच्या पॅलेटचा प्रयोग केला आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News : मंगळवेढा येथील प्रयोगशील शेतकरी वैभव मोडक यांनी ‘सीड विथ कॉम्पॅक्ट ऑरगॅनिक फर्टिलायझर’ तंत्रज्ञानाचा वापर करत गहू लागवडीमध्ये सेंद्रिय खताच्या पॅलेटचा प्रयोग केला आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदा त्यांनी गहू पिकामध्ये प्रयोग केला. त्यातून चांगले निष्कर्ष मिळाल्यानंतर यंदा त्यांनी परिसरातील २० शेतकऱ्यांच्या सहयोगाने एकूण वीस गुंठे क्षेत्रावर गहू पिकामध्ये पॅलेट वापराचा प्रयोग केला आहे. सध्या हे पीक जोमदार वाढीच्या अवस्थेत आहे.

याबाबत वैभव मोडक म्हणाले, की शेतकरी सध्या खत हे पिकास न देता, जमिनीस देत आहेत. मात्र मी तयार केलेल्या सेंद्रिय खत पॅलेटच्या माध्यमातून थेट पिकास अन्नद्रव्ये मिळतील हा या प्रयोगाचा उद्देश आहे. गेल्यावर्षी माझ्या शेतात एक गुंठे क्षेत्रावर गहू पिकासाठी पॅलेट वापराचा प्रयोग केला. एक गुंठ्यासाठी साधारण अकरा किलो पॅलेट लागले. अकरा किलो पॅलेट निर्मितीसाठी ६ किलो शेणखत, २ किलो लेंडीखत, १ किलो कोंबडी खत, १ किलो निंबोळी खत आणि एक किलो गहू बियाणे लागले. पॅलेट तयार करताना बियाण्यासह हे सर्व घटक चाळून घेतले.

त्यानंतर या मिश्रणामध्ये अडीच लिटर पाणी मिसळून एकजीव केले. त्यानंतर यंत्राद्वारे पॅलेट तयार केले. तयार झालेले पॅलेट उन्हात वाळवले. हे पॅलेट वाळविल्यानंतर शेतामध्ये टोकण पद्धतीने लागवड करता येते किंवा विस्कटून टाकल्या तरी चालतात. पॅलेट टोकण केल्यानंतर कुळवण्याची गरज नाही, परंतु विस्कटल्यास कुळवावे लागते.

पुढे गरजेनुसार वाफसा पाहून पाणी दिले. त्याशिवाय मी कोणतेही खत दिले नाही. यंदा ज्या शेतकऱ्यांकडे हा प्रयोग केला आहे, त्यांच्याकडून मी काही निष्कर्ष घेतो आहे. या प्रयोगातून किमान १ ते २ क्विंटलची हमखास वाढ मिळू शकेल, असा मला अंदाज आहे. या प्रयोगासाठी ज्येष्ठ वैज्ञानिक अरुण देशपांडे (अंकोली) यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

गव्हामधील प्रयोगाची वैशिष्ट्ये

पॅलेटमुळे पिकाला थेट खत मिळते.

पॅलेटमध्ये असलेले सेंद्रिय खत हेच पिकाचे मुख्य खत.

मशागत आणि बियाणे एवढ्या खर्चात गहू उत्पादन शक्य.

साधारणपणे एकरी १ ते २ क्विंटलची वाढ.

या प्रयोगामुळे गहू, भाताच्या लागवडीत सूसुत्रता येईल. ज्या शेतकऱ्यांना रासायनिक खत वापरायचे आहे, त्यांच्या खत वापरामध्ये ३० ते ४० टक्के बचत होईल. खर्चाच्या दृष्टीने विचार करता खतनिर्मितीसाठी लागणारे सर्व सेंद्रिय घटक शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी खर्चात गव्हाची उत्पादनवाढ साध्य होऊ शकते.
-वैभव मोडक, ८९५६३२६८५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: टोमॅटो दरात सुधारणा; सिताफळाला चांगला भाव, गवार तेजीत तर हळद-केळी दर स्थिर

Monsoon Rain: राज्यात पाऊस कमी होणार; मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार

Solar Project Nashik : दिवसा वीज देण्यासाठी सौरप्रकल्प पूर्ण करा

Livestock Market : बुलडाणा जिल्ह्यात जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बहिष्कार

Day-Time Electricity : अकोलेकाटी परिसरात दिवसा वीजपुरवठा

SCROLL FOR NEXT