Organic Farming : संतुलित सेंद्रिय आणि रासायनिक खत वापरून मिळवले उत्कृष्ट उत्पादन

Mosambi Production : जालना जिल्ह्यातील मानेपुरी (ता. घनसावंगी) उमेश रामराव वाघ यांची १० एकर शेती आहे. त्यातील ६ एकरांत त्यांनी मोसंबी लागवड केली आहे.
Mosambi Farming
Mosambi FarmingAgrowon
Published on
Updated on

Mosambi Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : मोसंबी

शेतकरी : उमेश रामराव वाघ

गाव : मानेपुरी, ता. घनसावंगी, जि. जालना

एकूण क्षेत्र : दहा एकर

मोसंबी क्षेत्र : सहा एकर

जालना जिल्ह्यातील मानेपुरी (ता. घनसावंगी) उमेश रामराव वाघ यांची १० एकर शेती आहे. त्यातील ६ एकरांत त्यांनी मोसंबी लागवड केली आहे. उमेश हे स्वतःची तीन एकर आणि भाऊ संदीप यांची तीन एकर अशा ६ एकरांतील संपूर्ण मोसंबी बागेचे व्यवस्थापन पाहतात. त्यांनी २००६ मध्ये दोन एकरांत मोसंबीची ३०० झाडे लावली.

त्यानंतर साडेचार एकरांत २०१८ मध्ये ७५० झाडांची लागवड केली. सध्या बागेत १०५० मोसंबी झाडे आहेत. मोसंबी बागेत आंबिया या एकाच बहराचे व्यवस्थापनावर करण्यावर भर दिला जातो. बहर धरल्यापासून ताण व्यवस्थापन, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर, शेणखत, स्लरी, सिंचन व्यवस्थापन आदी बाबींचे काटेकोर नियोजन केले जाते. त्यातून मोसंबी फळांचा दर्जा राखणे शक्य होत असल्याचे उमेश वाघ सांगतात.

Mosambi Farming
Mosambi Farming Management : मोसंबीतील आंबिया बहराचे व्यवस्थापन

आंबिया बहर व्यवस्थापन

मागील बहरातील फळांची तोड पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे १ नोव्हेंबरच्या दरम्यान बाग ताणावर सोडली जाते. हा ताण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तोडणार आहे. दरवर्षी साधारणतः दीड ते दोन महिने या कालावधीत बागेला ताण दिला जातो.

ताण कालावधीत झाडावरील सल काढणे, हलकी छाटणी, खराब फळे गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावणे अशी कामे करण्यावर भर दिला आहे. तसेच रोटाव्हेटरच्या साह्याने बागेत हलकी मशागत केली.

सध्या बागेतील झाडांना शेणखताच्या मात्रा देण्याचे काम सुरू आहे. प्रति झाड २० ते ५० किलो शेणखत देण्यात येत आहे. शेणखत उपलब्ध नसेल तर एक ते दीड किलो निंबोळी पेंड प्रति झाड प्रमाणे देण्याचे नियोजन असते.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ड्रीपद्वारे १ तास सिंचन करून बागेचा ताण तोडला जाईल.

ताण तोडताना रासायनिक खतांचे बेसल डोस दिले जातात. त्यात एनपीके, डीएपी, सल्फेट आणि पोटॅश यांचा वापर केला जातो. तसेच शेणखत, गोमूत्र, गूळ, बेसन, ट्रायकोडर्मा यांचे पाण्यात मिश्रण करून स्लरी तयार केली जाते. ही स्लरी ड्रीपद्वारे झाडांना दिली जाते.

ताण तोडल्यानंतर दुसरे पाणी ८ दिवसांनी आणि त्यानंतर १० दिवसांनी तिसरे पाणी दिले जाईल. तिसऱ्या पाण्यासोबत रासायनिक खतांच्या मात्रा देण्याचे नियोजन आहे.

Mosambi Farming
Mosambi Crop Disease : अति पाऊस, हवामान बदलामुळे मोसंबीवर रोगाचा प्रकोप

कीड-रोग व्यवस्थापन

मोसंबीवरील कीड-रोग नियंत्रणासाठी शिफारशीत बुरशीनाशक, कीटकनाशकांचा प्रमाणशीर वापर करण्याचे उमेश वाघ यांचे नियोजन असते. बागेत नवती निघण्यास सुरुवात झाल्यानंतर मावा, तुडतुडे, नागअळी, फुलकिडे आदी किडींचा प्रादुर्भाव दिसून येण्यास सुरुवात होते. या किडींच्या नियंत्रणासाठी १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा शिफारशीत रासायनिक घटकांच्या फवारण्या घेतल्या जातात.

सिंचन व्यवस्थापन

मोसंबी बागेत सिंचनाच्या पुरेशा सोयी तयार केल्या आहेत. बागेत वाफसा स्थिती राखण्यावर भर दिला जातो. सिंचनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब करण्यात आलेला आहे. त्यात डबल लाइनचे सहा ड्रीपर असून त्यातून ताशी तीन लिटर इतका डिस्चार्ज होतो. बागेचा ताण तोडताना सुरुवातीला एक तास ठिबकद्वारे सिंचन केले जाते. त्यानंतर तापमान वाढीनुसार बागेत वाफसा स्थिती कायम राहील अशा पद्धतीने गरजेनुसार सिंचनाचा कालावधी वाढविला जातो.

तणनाशकांचा वापर टाळला

बागेत तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर टाळला जातो. त्याऐवजी ब्रश कटरच्या साह्याने तण नियंत्रण करण्यावर भर दिला जातो. एप्रिल व जुलै या दोन महिन्यांत ब्रश कटरने तण कापून ते जागीच कुजण्यासाठी ठेवले जाते. त्याचा बागेतील झाडांस चांगला फायदा होतो. याशिवाय कोरफड, शेण, गोमूत्र, गूळ, बेसन, ट्रायकोडर्मा, वारुळाची माती आदी एकत्र करून तयार केलेली स्लरी दर पंधरा दिवसांनी झाडांना दिली जाते. शेणखत, निंबोळी खतांचा देखील प्रमाणशीर वापर करण्यावर भर दिला जातो. त्याचा चांगला फायदा बागेत दिसून येत आहे. असे उमेश वाघ

सांगतात.

उमेश वाघ, ९५२९०४०२१७

(शब्दांकन : संतोष मुंढे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com