Organic Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सेंद्रिय शेतीमधून रोजगाराच्या मोठ्या संधी : डॉ. सुधीर तांबे

Sustainable Agriculture : शेती हा व्यवसाय म्हणून करताना सेंद्रिय शेती मधून रोजगाराची मोठी संधी आहे असे मत जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Ahilyanagar News : धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला सकस व चांगले आहाराची गरज आहे. मात्र लवकर आणि जास्त उत्पादनासाठी अनेक रासायनिक औषधांची कृषी उत्पादनावर फवारणी केली जाते.

निरोगी समाजासाठी विषमुक्त शेती ही गरजेची आहे. शेती हा व्यवसाय म्हणून करताना सेंद्रिय शेती मधून रोजगाराची मोठी संधी आहे असे मत जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.

जयहिंद लोक चळवळीच्या वतीने संगमनेर येथे शाश्वत शेती व युवा उद्योजक कार्यशाळा झाली. माजी आमदार डॉ.. सुधीर तांबे, राहुरी कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ प्रशांत नाईकवाडी, डॉ. प्रशांत सावंत, अरविंद औताडे, यांच्यासह अन्य उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले, की भारत हा कृषिप्रधान देश आहे भारतातील ५५ टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत तर त्यांचा उत्पादनात वाटा अवघा १५% आहे. त्यामुळे उत्पादनापेक्षा शेतीवरील भार वाढतो आहे .म्हणून शेतीमध्ये आधुनिकता अन्य गरजेचे आहे. कमी श्रम ,कमी वेळ, कमी पैसा व अधिक उत्पन्न हे तत्त्व वापरण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा.

विषमुक्त शेती ही अत्यंत गरजेची झाली असून निरोगी समाजासाठी निरोगी अन्न महत्त्वाचे आहे. जमिनीचा पोत व आवश्यक बाबी शेतीमध्ये टाकल्या पाहिजे. याच प्रमाणे शेतीसाठी कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. जुन्या काळामध्ये खतासाठी खड्डे केले जायचे .मात्र सध्या खड्डे होत नसल्याने ते खत कंपोस्ट होत नाही. शेतीलाही हवा, ऊन, वारा, पाणी मिळाले पाहिजे.

शेती व्यवसायामध्ये महिलांचा वाटा मोठा असून तरुणांनी शेतीला व्यवसाय म्हणून पाहिले तर नक्कीच मोठे यश मिळू शकते. अनेक उच्चशिक्षित लोक आता शेतीकडे वळले आहे. आगामी काळात सेंद्रिय शेती ही अत्यंत महत्त्वाची असून या सेंद्रिय शेतीमधून उत्पादित सेंद्रिय मालाला मोठी मागणी आहे.

ऊस उत्पादन वाढीवर भर द्या’

डॉ. तांबे म्हणाले, की ऊस हे शाश्वत उत्पादन असून एकरी शंभर टक्के ऊस उत्पादन होण्यासाठी शेतकऱ्यांनी काम करावे. उसासाठी सेंद्रिय खताचा वापर केला तरही उसाचे उत्पादन चांगले वाढू शकते. यावेळी डॉ. राजेंद्र दुर्गुडे यांनी शेतीमधील पोत, शेतीचे प्रकार, माती परीक्षण, आवश्यक सेंद्रिय खतांचा पुरवठा, याबाबतचे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tobacco Farming : जिनेव्हा येथील परिषदेवरून तंबाखू उत्पादकांची संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेत वादाची ठिणगी; प्रकरण काय?

Agriculture Entrepreneur: चारा, बेणे विक्रीतून साधले करिअर!

Maharashtra Biodiversity: जैवसंपदा समित्यांना १.५८ कोटींचा निधी

Sugar Exports: देशातून १५ लाख टन साखर निर्यातीला केंद्राकडून हिरवा कंदील, मोलॅसिसवरील निर्यात शुल्कही हटवले

Farmer Welfare: शेती आणि शेतकरी वाचला तरच देश पुढे जाईल

SCROLL FOR NEXT