Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advice : संत्रा उत्पादनात सेंद्रिय कर्ब आणि घटकांचा वापर महत्त्वाचा; पाटील यांचे मत

Nivruti Patil : वाशीम जिल्ह्यात संत्र्याचे क्षेत्र वाढत आहे. दर्जेदार संत्रा उत्पादन घेताना जमिनीचा सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय घटकांचा वापर महत्त्वाची भूमिका वठवतो, असे प्रतिपादन करडा कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील यांनी केले.

Team Agrowon

Washim News : वाशीम जिल्ह्यात संत्र्याचे क्षेत्र वाढत आहे. दर्जेदार संत्रा उत्पादन घेताना जमिनीचा सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय घटकांचा वापर महत्त्वाची भूमिका वठवतो, असे प्रतिपादन करडा कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील यांनी केले. केव्हीकेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील दत्तक गाव वडजी येथे आयोजित मासिक फेरी व चर्चासत्रादरम्यान ते बोलत होते.

केव्हीकेच्या उद्यान विद्या विभागातर्फे रिसोड तालुक्यात संत्रा व हळद या पिकांवर गट शेती उपक्रमांतर्गत मासिक चर्चासत्र व शिवार फेरी गुरुवारी (ता. २६) झाली. कार्यक्रमाला प्रगतिशील संत्रा उत्पादक शेतकरी विलास बोरकर हे अध्यक्षस्थानी होते. पहिल्या सत्रात शिवार फेरीमध्ये डॉ. सुनील बोरकर यांच्या गोकृपा अमृत आधारित नैसर्गिक शेती पद्धतीअंतर्गत विकसित केलेल्या संत्रा बागेची तज्ज्ञ व शेतकऱ्यांनी पाहणी केली.

फळांची आणि पानांची तसेच संपूर्ण बागेची गुणवत्ता बघून समाधान व्यक्त केले. या बागेमधील नियोजनाचे बारकावे समजून घेतले. त्यानंतर नाना बोरकर, शिवाजी बोरकर, राजेश बोरकर, अंकुश बोरकर व गोपाल बोरकर यांच्या संत्रा बागांची पाहणी करून पुढील उपाय योजनांबद्दल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

राजेश बोरकर यांच्या १०० टक्के गोकृपा अमृत नैसर्गिक शेती पद्धतीद्वारे विकसित केलेल्या हळद प्लॉटची पाहणी करण्यात आली. श्री. बोरकर यांनी लागवडी पासून ते आतापर्यंत संपूर्ण नियोजन व केलेल्या उपाययोजनांबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.

तांत्रिक सत्रात निवृत्ती पाटील यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व, पिकांची अन्न निर्मितीची प्रक्रिया व यामध्ये सेंद्रिय कर्ब व जिवाणू यांची महत्त्वाची भूमिका सविस्तरपणे मांडली. कार्यक्रमास वाशीमसह बुलडाणा जिल्ह्यातील हळद व संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक ईडोळे यांनी केले. तर गोविंद देशमुख यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women in Agriculture : शेतीत महिलांचे नेतृत्व वाढले तरच कृषी विकासाला नवी दिशा मिळेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

US Israel Iran War: मोठा दिलासा, भारतीय जहाजांना होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी

Power Supply Disconnection: अकोला विभागातील २९ हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Women Empowerment: महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विशेष विधेयक आणणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Grape Farming: दर्जेदार बेदाण्यासह संभाव्य घड निर्मितीसाठी उपाययोजना

SCROLL FOR NEXT