Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : पाण्याअभावी करपू लागल्या फळबागा

Orchard Damage : तीव्र दुष्काळी स्थिती, उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतशिवारातील कुपनलिका, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. याचा मोठा फटका तालुक्यातील ३१५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना बसला आहे.

Team Agrowon

Lohara News : तीव्र दुष्काळी स्थिती, उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतशिवारातील कुपनलिका, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. याचा मोठा फटका तालुक्यातील ३१५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना बसला आहे. हिरव्यागार दिसणाऱ्या फळबागा पाण्याअभावी करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या जात आहेत.

गतवर्षी तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने विहिरी, नदी, नाले, तलाव पूर्ण क्षमतेने भरलेच नाहीत. परिणामी, भर हिवाळ्यात पाणीटंचाईचे संकट तालुक्यात निर्माण झाले. यंदा उन्हाने उग्ररूप धारण केले आहे. उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतशिवारातील कूपनलिका, विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत.

याचा मोठा फटका फळबागांना बसला आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, मोसंबी, सीताफळ, लिंबू, केळीसह फळबागांची लागवड केली आहे. विहिरीतील पाणी तळाशी गेल्याने फळबागा कशा जगवाव्यात, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. अनेक गावांमध्ये फेब्रुवारीपासूनच टँकरचे पाणी विकत घेऊन फळबागांना दिले जात आहे.

सध्या एप्रिल व मे महिन्यात तर पाणीटंचाईचे चित्र भीषण झाले आहे. परिणामी, फळबागा जगवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. खर्च आवाक्याबाहेर जात असतानाही फळबागा जगवाव्या लागत आहेत.

...असे आहे फळबाग क्षेत्र

द्राक्ष ८० हेक्टर

आंबा ११८ हेक्टर

पेरू ४२ हेक्टर

सीताफळ ३६ हेक्टर

चिकू ४ हेक्टर

लिंबू २ हेक्टर

केळी १८

इतर १५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT